(दापोली)
दापोली तालुक्यात जि.प.शाळांचा दर्जा उंचावण्यासाठी कास्ट्राईब संघटनेसारखे कोणत्याही संघटनेने अथवा शिक्षण विभागाने विधायक कार्य हाती घेतल्यास आपण सदैव सहकार्य करु, अशी ग्वाही दापोली अर्बन बॅंकेचे अध्यक्ष, जयवंत जालगावकर यांनी दिली. ते तालुक्यातील टाळसुरे येथे शुक्रवार दि.१० रोजी शिष्यवृत्ती मार्गदर्शक शिक्षकांसाठी, कास्ट्राईब शिक्षक संघटना आयोजित तालुकास्तरीय कार्यशाळेत प्रमूख अतिथी म्हणून बोलत होते.
प्रारंभी मान्यवरांचे हस्ते दीपप्रज्वलन करणेत आले, तद्नंतर कास्ट्राईब शिक्षक संघटना समाज, विद्यार्थी आणी शिक्षक अशा तीन स्तरांवर नियमीत कार्यशील असून गत अनेक वर्षापासून शिष्यवृत्ती परीक्षा विषयी मार्गदर्शन उपक्रम सुरु सल्याचे तालुका अध्यक्ष उमेश मर्चंडे यांनी प्रास्ताविकात सांगितले. तर गत सात वर्षापासून विद्यार्थ्याचा मन-मेंदूआणि मनगट अशा सर्वांगिन विकासासाठी दापोली तालुक्यातून व्हिजन दापोली हा स्वप्नवत उपक्रम सुरू असून, याची दखल सर्वत्र घेत असल्याचे दिसून येते.
कास्ट्राईब शिक्षक संघटना ही विद्यार्थी हितासाठी असे उपक्रम घेणारी अग्रेसर संघटना असून,यांचा आदर्श इतरांनीही घ्यावा असे आवाहन गटशिक्षणाधिकारी अण्णासाहेब बळवंतराव यांनी यावेळी केले. तज्ञ- सुहास रमाकांत वाडेकर आणि केतन भालचंद्र ब्रीद यांच्या प्रमुख मार्गदर्शनात दिवसभर संपन्न झालेल्या युक्त्या आणि क्लृप्त्यांच्या कार्यशाळेत विविंध मान्यवर उपस्थित होते. त्यामध्ये कास्ट्राईबचे जिल्हाध्यक्ष आणि शिक्षक पतपेढी संचालक संतोष कांबळे, RDC दापोलीचे माजी व्यवस्थापक अशोक जाधव, व्हिजन दापोलीचे अध्यक्ष धनंजय सिरसाट, सरपंच, पूर्वा सकपाळ, उपसरपंच, विकास जाधव व्यवस्थापन अध्यक्ष श्रमती लाले, उपाध्यक्ष,संजय धाडवे, पोलीस पाटील विजय सकपाळ, LIC चे प्रतिनीधी जितेंद्र जाधव,यांचेसह तालुक्यातील सर्व शिक्षक संघटनांचे अध्यक्ष ,शिक्षण विस्तार अधिकारी, रामचंद्र सांगडे, पद्मन लहांगे, बळीराम राठोड कास्ट्राईब चे तालुका सचीव आणि टाळसूरे शाळेचे मुख्याध्यापक प्रवीण तांबे कोषाध्यक्ष राजेंद्र जाधव व तालुक्यातील सर्व शाळांमधील शिक्षक उपस्थित होते.
कार्यशाळा यशस्वीतेसाठी संघटनेच्या सर्व शिलेदारांनी मेहनत घेतली. सुत्रसंचालन राकेश महाडिक आणि आशा जाधव यांनी केले.