(वास्तू)
धरतीवर जेवढा भार मुंग्यांचा आहे तेवढाच माणसांचा आहे. घरात मुंग्या दिसणे ही एक सामान्य गोष्ट आहे, त्यामुळे अनेकदा आपण या घटनेकडे दुर्लक्ष करतो. मात्र या मुंग्या शुभ आणि अशुभ घटनाही सांगतात. ज्योतिष शास्त्रानुसार घरात मुंग्याचे येणे केवळ तुमची आर्थिक स्थितीच दर्शवत नाहीत तर भविष्यात होणाऱ्या नुकसानीचीही माहिती देते. मुंग्या तूप खात नाहीत ही गोष्ट सर्वांना माहीत आहे, तरीही त्या तुपाच्या भांड्यात दिसतात. जिथं साफसफाई केली आहे, जिथं किंचितही घाण नाही, तिथंही मुंग्या दिसू लागतात. हे का घडते?
साधारणपणे मुंग्या दोन प्रकाराच्या असतात लाल आणि काळी. काळ्या मुंग्या शुभ मानल्या गेल्या आहेत परंतू लाल नाही. लाल मुंग्यांबद्दल म्हणतात की, घरात लाल मुंग्यांची संख्या वाढल्यास कर्ज वाढतं. आणि लाल मुंग्या संकटाचे संकेत आहे. अशात लोकं मुंग्या मारण्यासाठी औषध टाकतात. अशात त्यांच्यावर हत्या दोष लागतो म्हणजे सरळ भाषेत म्हणायचं तर एका संकटापासून वाचण्यासाठी दुसर्यात संकट ओढणे. अनेकदा लाल मुंग्या मारण्यासाठी केलेल्या उपायामुळे काळ्या मुंग्याही मरतात. अशात काय करावे हा प्रश्न आपल्या मनात निश्चितच उद्भवत असेल…
लाल मुंग्यांना मारण्यासाठी अहिंसक उपाय
- लाल मुंग्यांना कोणत्याही प्रकाराच्या कीटनाशक वापरू नये. आपल्या घरात लिंबू तर असेलच. लिंबाला जरा सोलून म्हणजे काही सालं काढून त्याचे तुकडे करावे आणि हे तुकडे लाल मुंग्या असतील त्या ठिकाणी ठेवून द्यावे. काही वेळातच मुंग्या तिथून नाहीश्या होतील.
- दुसरा उपाय म्हणजे आपण तेजपानाचे तुकडे करून देखील मुंग्या असलेल्या ठिकाणी ठेवू शकतात.
किंवा लवंग आणि काळी मिरीदेखील वापरू शकता. - तसेच याच मुंग्यांमुळे कर्जमुक्ती सुद्धा होते. त्यासाठी एक उपाय आहे की दोन्ही प्रकाराच्या मुंग्यांना कणीक टाकल्याने कर्जापासून मुक्ती मिळते. मुंग्यांना साखर मिसळून कणीक टाकल्याने व्यक्ती प्रत्येक बंधनातून मुक्त होतो. हजारो मुंग्यांना दररोज आहार दिल्याने मुंग्या संतुष्ट होतात आणि यामुळे मनुष्य प्रत्येक संकटातून बाहेर पडतो.
- तर मुंग्यांना कणीक देण्याने आणि लहान-लहान चिमण्यांना तांदूळ खाऊ घालणारे वैकुंठात जातात असे ही मानले गेले आहे. तसेच ऋणमुक्तीसाठी मुंग्यांना कणीक आणि साखर टाकावी.
- लाल मुंग्यांना ओळीत जात असताना मुंग्यांच्या तोंडात अंडी असलेले बघणे शुभ असतं. याने संपूर्ण दिवस किंवा नजीकचा कालावधी शुभ आणि सुखात जातो.
काळ्या मुग्या घरात येण्याचा अर्थ
घरात अचानक काळ्या मुंग्या दिसू लागल्या तर ते शुभ लक्षण आहे. तुमच्या आयुष्यात बदल होणार आहे. असा कोणताही बदल, जो तुमच्यासाठी फायदेशीर असेल. हे तुमच्या कुटुंबासाठी शुभ असेल, परंतु याचा अर्थ असा नाही की तुम्ही मुंग्यांना असेच येऊ द्यावे किंवा त्यांना आमंत्रित करावे.
काळ्या मुंग्यावर उपाय
काळ्या मुंग्यांचे आगमन केवळ जीवनात बदल घडवून आणण्यासाठी होत आहे हे स्पष्टपणे समजल्यावर त्यांच्या स्वागतासाठी त्यांच्यासमोर पीठ टाकावे, असे केल्याने मुंग्या आपोआप परत जातील. तसेच अशा मुंग्यांमुळे कर्जमुक्ती होते. त्यासाठी एक उपाय आहे की दोन्ही प्रकाराच्या मुंग्यांना कणीक टाकल्याने कर्जापासून मुक्ती मिळते. मुंग्यांना साखर मिसळून कणीक टाकल्याने व्यक्ती त्रासाच्या बंधनातून मुक्त होतो. हजारो मुंग्यांना दररोज आहार दिल्याने मुंग्या संतुष्ट होतात आणि यामुळे मनुष्य प्रत्येक संकटातून बाहेर पडतो. यामुळे आपल्या आयुष्यात बदल होणार आहे. असा कोणताही बदल, जो तुमच्यासाठी फायदेशीर असेल. हे तुमच्या कुटुंबासाठी शुभ असेल, परंतु याचा अर्थ असा नाही की तुम्ही मुंग्यांना असेच येऊ द्यावे किंवा त्यांना आमंत्रित करावे. काळ्या रंगाच्या मुंग्या तुमच्या घरातून बाहेर पडत असतील तर हे लक्षण मानले जाते की घरात सुख-समृद्धी येणार आहे. यासोबतच तुमचे शारीरिक सुख वाढणार आहे हे देखील एक शुभ लक्षण आहे.