(रत्नागिरी / प्रतिनिधी)
जिल्हा शासकीय रुग्णालयाचे नूतन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप यांचे स्वागत राष्ट्रीय अपंग विकास महासंघाचे जिल्हाध्यक्ष, संजीवनी दिव्यांग विकास संघटनेच्या वतीने संस्थापक-अध्यक्ष राकेश कांबळे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी केले.
दिव्यांग बांधवांच्या हातात पुष्पगुच्छ पाहून डॉ जगताप हे खुर्चीवरून बाहेर येऊन सन्मानाने खाली वाकून दिव्यांग बांधवांच्या हस्ते पुष्पगुच्छ स्वीकारला. यातून दिव्यांगांच्या अडचणी सोडवण्यासाठी ते तत्परत असल्याची स्पष्टता येऊन जाते. या भेटी दरम्यान जगताप यांनी राष्ट्रीय अपंग विकास महासंघाचे जिल्हाध्यक्ष व पदाधिकाऱ्यांसोबत विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी आकाश कांबळे, गणपत ताम्हणकर, राखी कांबळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.