(गावखडी / वार्ताहर)
रत्नागिरी जिल्हा परिषदेचे नव्याने रूजू झालेले प्राथमिक शिक्षणाधिकारी श्री. भिकाजी कासार यांचे महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी संघटनेच्या वतीने रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष श्री.विलास गोरे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी रत्नागिरी जिल्हाध्यक्ष माननीय श्री.विलास गोरे, जिल्हा संघटक व्यंकटेश आटक, जिल्हा कोषाध्यक्ष उदय चाळके, जिल्हा कार्यालयीन सरचिटणीस चंद्रशेखर पेटकर, जिल्हा महिला संघटक पायल मुंजेवार, जिल्हा महिला संघटक सौ.गावखडकर, लांजा तालुकाध्यक्ष लिंगाणणा भुसनूर आणि संघटनेचे सर्व पदाधिकारी यांची उपस्थिती होती.
प्रथमतः महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री.विलास गोरे यांनी महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी संघटनेच्या कामाची ओळख करून दिली. दिव्यांग शिक्षक विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची उत्कृष्टपणे अंमलबजावणी करीत आहेत. परंतू जिल्हा परिषदेमध्ये दिव्यांग शिक्षकांचे दिव्यांग कर्मचारी पदोन्नती, दिव्यांग कर्मचारी यांना सहाय्यक उपकरणे, दिव्यांग अनुशेष भरणे यासारखे काही प्रश्न प्रलंबित आहेत, ते प्रश्न प्राधान्याने सोडवण्यात यावे अशी दिव्यांग कर्मचारी संघटनेच्यावतीने प्राथमिक शिक्षणाधिकार श्री.भिकाजी कासार यांना जिल्हाध्यक्ष श्री.विलास गोरे यांनी विनंती केली. त्यावर श्री.भिकाजी कासार यांनी दिव्यांग कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्याबाबत सकारात्मक चर्चा केली.
Follow us on Google News : https://news.google.com/s/CBIw9dzq7KQB?sceid=IN:en&sceid=IN:en&sceid=IN:en&r=0&oc=1