(संगमेश्वर / एजाज पटेल)
सामाजिक कार्यकर्ते तसेच संगमेश्वर बाजारपेठेतील प्रतिष्ठित व्यापारी विवेक उर्फ बाळा शेट्ये यांच्या अर्धशतकी वाढदिवसाच्या निमित्ताने 1990 च्या बॅच चे वर्गमित्र, व्यापारी आदी क्षेत्रातील परिवाराकडून भरभरून शुभेच्छा देण्यात आल्या.
आपला समाज, आपली जनता हाच आपला परिवार, हेच आपले मायबाप अशी भावना मनात ठेऊन निरंतर समाजाची सेवा करत राहणारे प्रेमळ व दयाळू स्वभावाचे व्यक्तिमत्व असलेले विवेक उर्फ बाळा शेट्ये यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी संगमेश्वर तालुक्यातूनच नव्हे तर इतर अनेक ठिकाणावरून कार्यकर्त्यांनी विवेक शेट्ये यांना भरभरून शुभेच्छा दिल्या, तसेच अनेक जणांनी भेटून तसेच फोनवरून शुभेच्छा व्यक्त केल्या. विवेक शेट्ये यांनी सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करताना समाजाप्रती प्रेम व निष्ठा असल्यामुळे मी सतत समाजासाठी यापुढेही अधिक चांगले काम करत राहीन, या करता मला सदैव तुमच्या आशीर्वादाची गरज आहे असे ते यावेळी भावुक भावनेने बोलले.