(रत्नागिरी)
सिंधूरत्न समृद्ध योजनेचे सदस्य, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आणि शिवसेना पक्षाचे नेते किरण उर्फ भय्या सामंत यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत राजापूर तालुक्यातील आजीवली तेलीवाडी, तळवडे गोसावीवाडी, जवळेकर धावडेवाडी या भागातील ग्रामस्थांनी शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केला. त्याच्यामध्ये काही ग्रामपंचायत सदस्य, काही आजी माजी पदाधिकारी यांचा देखील समावेश आहे. अपूर्वा किरण सामंत आणि राजापूर तालुकाप्रमुख दीपक नागले यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हे पक्षप्रवेशाचे कार्यक्रम संपन्न झाले.
तळवडे गोसावी वाडी गावातील दत्त मंदिर येथे वाडीची बैठक असताना अपूर्वा सामंत यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी आगामी विधानसभा निवडणुकीत सर्व ग्रामस्थांना किरण उर्फ सामंत यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन त्यांनी केले. त्याचप्रमाणे जवळेथर धावडेवाडी या ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य अनिल शांताराम रेवाळे यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला.
या सर्व पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाप्रसंगी तालुका संघटक भरत लाड, युवा सेना तालुका प्रमुख सुनील गुरव, विभाग प्रमुख शैलेश साळवी, अमर जाधव उदय राणे, पक्ष निरीक्षक संदेश सावंत पटेल, ज्येष्ठ कार्यकर्ते आप्पा साळवी आदी पदाधिकारी उपस्थित होते. त्याचप्रमाणे अजिवली तेली वाडी येथील पक्षप्रवेशाचा कार्यक्रमाप्रसंगी महिला तालुकाप्रमुख शुभांगी डबरे या देखील उपस्थित होत्या.
आमच्या गावांमध्ये मागील दहा ते पंधरा वर्षापासून अनेक विकासाची कामे प्रलंबित आहेत, या भागात अनेक समस्या आहेत. आणि या सर्व समस्या फक्त किरण उर्फ भय्या सामंतच सोडवू शकतात असा आमचा ठाम विश्वास आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये किरण भय्या सामंत यांना आमच्या गावामधून जास्तीत जास्त मताधिक्य मिळवून देऊ असा निर्धार या सर्व पक्षप्रवेश करणाऱ्या ग्रामस्थांनी केला.