(गणपतीपुळे / वैभव पवार)
जयगड मध्ये गेल्या काही गेल्या दिवसांपूर्वी वायुगळतीची घटना घडल्यानंतर सुमारे 84 विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागला. त्यानंतर देखील काही विद्यार्थ्यांना आणि प्रौढाना अद्याप देखील त्रास जाणवत असल्याने अनेक जण खाजगी आणि सरकारी रुग्णालयांमध्ये उपचार घेण्यासाठी दाखल आहेत. याच विरोधात जयगड मधील ग्रामस्थ व पालक आक्रमक झाले असून त्यांनी आज बुधवारी दुपारनंतर कंपनी विरोधात तीव्र आंदोलन केले आहे. यामध्ये आंदोलकांनी रास्ता रोको करून कंपनीच्या गाड्याही रोखल्या. तसेच तसेच जिंदाल कंपनीचा एन्ट्री गेट पालकांनी बंद केला. त्यानंतर जयगड पोलीस ठाण्यावर मोठी धडक दिली.
जयगड परिसरातील शालेय मुलांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागल्याने सर्व पालकांनी मोर्चा काढून कंपनी प्रशासनाविरुद्ध रोष व्यक्त केला आहे. तसेच कायमस्वरूपी उपाययोजनांची मागणी केली असून यापुढे नागरिकांच्या आरोग्याला मोठा धोका होऊ शकतो, असे येथील ग्रामस्थांच्या पालकांचे म्हणणे आहे. त्यामुळे ग्रामस्थ पालकांच्या एकूण सोळा प्रमुख मागण्यांमध्ये जे एस डब्ल्यू कंपनीकडून १०० बेड मल्टीएल सुसज्ज दवाखाना, तीन ॲम्बुलन्स, उत्कृष्ट दर्जाचे तीन डॉक्टर व कला व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय. व माध्यमिक विद्यामंदिर जयगड मधील विद्यार्थ्यांना व भविष्यात शिकत असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना व नागरिकांना लाईफ इन्शुरन्स काढून देण्यात यावे अशा वेगवेगळ्या प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर कंपनी प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन व मोर्चा काढल्यानंतर पालक व ग्रामस्थांनी जे एस डब्ल्यू युनिटचे हेड श्री. दवे यांच्यावर तत्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा व योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मोठी मागणी करण्यात आली.
तसेच यापुढे कंपनीकडून नागरिकांना व विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारे त्रास होऊ शकतो म्हणून प्रशासनाने कंपनीकडून हमीपत्र घेण्यात यावे अशी मागणी देखील मोर्चादरम्यान करण्यात आली.