(जाकादेवी / संतोष पवार)
रत्नागिरी तालुक्यातील मोहिनी मुरारी शिक्षण संस्थेतर्फे जाकादेवी खालगांव मंदिरापासून ते चाफे मोहिनी मुरारी मयेकर महाविद्यालयाच्या श्री. गोपाळ कृष्ण मंदिरापर्यंत सुमारे ४ किलोमीटर अंतरापर्यंत वारकरी दिंडीचे आयोजन करण्यात आले.
वारकरी दिंडी समाजात व नवीन पिढीमध्ये सांस्कृतिक, सामाजिक, मूल्यांची व एकोप्याची वाढ व्हावी, हे मूल्य रुजविणे हा या दिंडीचा उद्देश होता. चाफे येथील मोहिनी मुरारी मयेकर महाविद्यालयाचे विद्यार्थी तसेच जाकादेवी प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी, डी.जे. सामंत इंग्लिश मिडियम स्कूल जाकादेवी येथील विद्यार्थी वारकरी वेषांमध्ये मोठ्या भक्ती भावाने व विठुमाऊलीच्या गजरात उत्साहाने सहभागी झाले होते.
जाकादेवी -खालगाव देवस्थान मुख्य बाजारपेठ ते चाफे मुख्य मार्गावरून काढण्यात आलेल्या या दिंडीचे अनेक भाविकांनी उत्स्फूर्त स्वागत केले. या आषाढी एकादशीच्या निमित्ताने काढण्यात आलेल्या विद्यार्थी वारकरी दिंडीच्या उद्घाटन मालगुंड एज्युकेशन सोसायटीचे संचालक श्री. किशोर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी माऊली संगीत विद्यालयाचे भजनी मंडळीनी टाळ मृदुंगाच्या ठेक्यावर ताल धरत वारीला सुरुवात केली. संत ज्ञानोबा, तुकोबा, एकनाथांच्या अभंगाने वारीला अधिकच रंग चढला. पांडुरंगाच्या नावाच्या गजरात विद्यार्थी बेधुंद होऊन भक्तीमय वातावरणात रंगून गेले.
या कार्यक्रमाला मोहिनी मुरारी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष नंदकुमार साळवी, कार्याध्यक्ष व सचिव रोहित मयेकर, खजिनदार ऋषिकेश मयेकर,श्रीम. दीप्ती मयेकर, श्रीम.शिरीषा मयेकर, संस्थेचे संचालक सुरेंद्र माचिवले, महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या सौ.स्नेहा पालये, जाकादेवी हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक (CEO) किशोर पाटील, जाकादेवी हायस्कूलचे मुख्याध्यापक नितीन मोरे , डी.जे. सामंत इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका सुरेखा हांडबर, युवा कार्यकर्ते संकेत देसाई, प्रतिक देसाई, बंटी सुर्वे, पोलीस व सुरक्षा खात्यातून ए. एस. आय. किशोर जोशी, पी.एस.आय. क्रांती पाटील, पी.एस.आय संदीप साळवी, हेड कॉन्स्टेबल कुणाल चव्हाण, हवालदार कीर,होमगार्ड संदीप पवार व शिगवण, प्राध्यापक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, माजी विद्यार्थी गुरुनाथ वेतोसकर, दर्शन खापरे, साहिल वीर, अमित घाणेकर,राहुल रेवाळे, श्रवणकुमार पुर्बीया तसेच विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्यासंख्यने उपस्थित होते.