(रत्नागिरी)
भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा रत्नागिरी यांच्या अंतर्गत भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा मंडणगड या शाखेच्या विद्यमाने ग्राम शाखा निगडी व ग्राम शाखा दहागाव मंडणगड या ठिकाणी दिनांक.२४.०१.२०२५ ते दिनांक ०२.०२.२०२५ या कालावधीत दहा दिवस उपासिका धम्म प्रशिक्षण शिबिर आयु.दिलीप साखरे ग्राम शाखा निगडी व आयु.प्रकाश खैरे ग्राम शाखा दहागाव यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेले आहे. या शिबिरात धम्म प्रशिक्षण घेण्यासाठी ४० उपासिकांनी (महिलांनी ) सहभाग घेतलेला आहे.या उपासिकांना प्रशिक्षण देण्यासाठी राज्य शाखेकडून गीता ताई कांबळे केंद्रीय शिक्षिका ज्योतीताई साळवी केंद्रीय शिक्षिका यांची म्हणून निवड करण्यात आली आहे.
या प्रसंगी बुद्ध विहारात मान्यवरांच्या हस्ते महामानवांच्या प्रतिमाना पुष्पहार अर्पण करून व पंचांग प्रणामासह त्रिशरण पंचशील घेऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यानंतर उपासिका धम्म प्रशिक्षण शिबिरामध्ये सहभागी झालेल्या उपासिकांचा परिचय मान्यवरांच्या समक्ष करून घेण्यात आला. विजय जाधव उपाध्यक्ष जिल्हा संस्कार विभाग प्रमुख यांनी या शिबिराचे उद्घाटन झाल्याचे जाहीर केले. त्यानंतर उपस्थित सर्व मान्यवरांचे ग्राम शाखेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. या शिबिराला विजय जाधव उपाध्यक्ष जिल्हा संस्कार विभाग अल्पेश सकपाळ सचिव जिल्हा संस्कार विभाग गीताताई कांबळे केंद्रीय शिक्षिका ज्योतीताई साळवी केंद्रीय शिक्षिका हर्षद जाधव अध्यक्ष तालुका मंडणगड यांनी आणि उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाला गणेश साखरे, सुमेध खैरे, विजय जाधव, संजीवन साखरे, विलास सावंत, मनोहर साखरे, कल्पना साखरे,अशोक जाधव, महेंद्र पवार, गौतम पवार,शरद पवार, मुकुंद पवार तसेच तालुका शाखा व ग्राम शाखा यांचे पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन. प्रफुल्ल खैरे सचिव तालुका संस्कार विभाग व शैलेश पवार उपाध्यक्ष तालुका संस्कार विभाग प्रमुख यांनी केले.यानंतर सर्वांचे आभार मानून आजच्या दिवसाचा समारोप करण्यात आला.
या शिबिराचा सांगता समारंभ आदर्श पिता रामजी बाबा सुभेदार यांच्या स्मृतिदिनी रविवार दिनांक.०२ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ११.०० वा.डाॅ.बाबासाहेब यानंतर आंबेडकर राष्ट्रीय स्मारक मंडणगड येथे राज्य, जिल्हा पदाधिकारी यांच्या हस्ते होणार आहे.