सावधान! तुमच्या एका चुकीमुळे गाडीचं इंजिन होऊ शकतं लॉक; जाणून घ्या!
आपल्या गाडीचं इंजिन जर मजबुत आणि चांगल्या परिस्थितीत असेल तर आपल्या गाडीचं आयुष्य वाढणार हे नक्की. पण जर आपल्या गाडीच्या इंजिनमध्ये थाडीशी जरी गडबड झाली तर प्रवासाची मजा जाते आणि गाडीही खर्च काढते. त्यामुळे वेळेवर गाडीची सर्हिसिंग करणं गरजेचं आहे. जास्त करून जुन्या गाड्यांचं इंजिन लॉक होण्याचं प्रमाण जास्त असतं. आता तर नवीन गाड्यांनासुद्धा इंजिन लॉक होत आहेत. त्यामुळे इंजिन नक्की कोणत्या कारणांमुळे लॉक होत हे आपण पाहणार आहोत.
इंजिन लॉक होतं म्हणजे नक्की काय होतं?
इंजिन लॉक होतं म्हणजे इंजिनची हालचाल थांबली जाते. काही निष्काळजीपणा आणि चुकीच्या ड्राईव्हमुळे इंजिनवर वाईट परिणाम होतो आणि इंजिन लॉक होते. आपल्या शरीरातील हदय ज्याप्रमाणे असतं त्याप्रमाणे वाहनाचं इंजिन असतं. त्यामुळे आपण आपल्या हदयाची ज्याप्रमाणे काळजी घेतो त्याप्रमाणे आपण इंजिनची काळजी घ्यायला हवी.
पुढील आहेत कारणे :
जेव्हा कारच्या इंजिनच्या सिलिंडरमध्ये पाणी वाहून गेल्याने पिस्टन खराब होतो. ज्यामुळे इंजिन लॉक होण्याची शक्यता अधिक होते. त्यामुळे भरलेल्या पाण्यात वाहन चालवू नका आणि मुसळधार पाऊस पडत असेल तर वाहन चालवू नका.
बर्याच वेळा निकृष्ट दर्जाचे किंवा भेसळयुक्त पेट्रोल किंवा डिझेल वापरल्यास इंजिन लॉक होऊ शकतं. म्हणून केवळ चांगल्या प्रतीचे इंधनच वापरावं. आपली कार वेळेवर सर्व्हिस करा, काही पैसे वाचवण्यासाठी आपली गाडी गमावून बसताल.
इंजिन लॉक होण्याचं कारण म्हणजे ओव्हरहीटिंग. प्रत्येक वाहनात उच्च तापमानाचे सिग्नल असते. याकडे कधीही दुर्लक्ष करू नका नाहीतर गाडीचं इंजिन होण्याची शक्यता जास्त असते.
इंजिन लॉक होण्याचं महत्वाचं कारण म्हणजे टाइमिंग बेल्ट किंवा टाइमिंग चैन तुटल्यानेही इंजिन लॉक होण्याची शक्यता असते. त्यामुळे गाडी चालवताना चालकाने ही दक्षता घ्यायला हवी.
जर आपल्या इंजिन सिलिंडरमध्ये पाणी संपलं तर पिस्टन खराब होऊ शकतो. यामुळे आपले इंजिन लॉक होऊ शकतं. वाहन जेव्हा पाण्यामध्ये चालवलं जातं तेव्हा हा प्रोब्लेम होऊ शकतो.
काहीजण वाहन चालवताना फक्त गाडीच चालवतात पण गाडीची काळजी घेत नाही. कारण वेळेला गाडीला ऑइलिंग करायला हवं. कारण यामुळेही आपल्या गाडीचं इंजिन लॉक होण्याची शक्यात असते.
आपण गाडीची काळजी घेतली नाही तर आपलं वाहनाच्या इंजिनसह अनेक अडचणी येतात. त्यामुळे थोड्याशा पैशाकडे पाहून आपण काळजी घेतली नाही तर आपल्याला ते मोठे खर्चिक पडतं.