(संगमेश्वर / प्रतिनिधी)
संगमेश्वर तालुका रास्त भाव दुकान चालक मालक संघटनेची कार्यकारणी निवड बिनविरोध करण्यात आली. संगमेश्वर जाखमाता मंदीर येथे संगमेश्वर तालुक्यातील रास्त भाव धान्य दुकान चालक मालक यांची सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला संगमेश्वर तालुक्यातून ८० रेशन दुकान चालक, मालक उपस्थित होते. सभा अतिशय शांततामय पूर्ण वातावरणात संपन्न झाली.
या सभेमध्ये अनेक विषयांवर साधक,बाधक चर्चा झाली. दुकानदारांना भेडसावणाऱ्या समस्या,त्यावर शासन आणि प्रशासन,स्तरावर योग्य त्या समन्वय साधून उपाययोजना करणे, संघटना मजबुतीकरण, संघटना सक्षमीकरण, अधिकारी वर्ग यांच्या सुचनेचे पालन आणि अंमलबजावणी, तसेच दुकानदार यांची ग्राहकांप्रति कर्तव्य या विषयावर देखील चर्चा झाली. सभेला, रेशन संघटनेचे जिल्हाध्यक्ष माननीय अशोकराव कदम यांची विशेष उपस्थिती होती. त्यांनी देखील सभेला संबोधित केले. यावेळी योग्य मार्गदर्शन करत असताना दुकानदारांच्या समस्या सोडविण्याकरिता शासन स्तरावर आपण पाठपुरावा करून त्या सोडविण्याकरिता कटिबद्ध असल्याचे सांगितले.
सुरुवातीला सर्वांचे स्वागत श्री रोशन शिंदे यांनी केले आणि सभेच्या आयोजन मागील उद्देश स्पष्ट केला, त्यांनतर जेष्ठ दुकान चालक श्री गंगाधर पंडित यांनी सभेच्या आयोजनाबद्दल सविस्तर विषय सभेसमोर ठेवले. यानंतर अनेक दुकानदार यांनी चर्चेत सहभाग घेत आपापली मते नोंदवली व संघटना मजबूत करण्यसाठी कार्यकारिणी बदलणे गरजेचे आहे असे मत व्यक्त केले. सर्वानुमते विचारात घेऊन कार्यकारणीत बदल करण्याचे निश्चित करून नवी कार्यकारणी जाहीर करण्यात आली.
संघटनेच्या तालुका अध्यक्ष पदी संगमेश्वर येथील श्री रोशन शिंदे, उपाध्यक्ष पदी साखरपा भडकंबा येथील श्री अतुल शिंदे, तुरळ येथील श्री विनायक गुरव, सचिव पदी-संगमेश्वर येथील श्री शंतनू शेट्ये, खजिनदार पदी-संगमेश्वर येथील श्री संतोष खातू कार्यकारणी सदस्य पदी सरंद येथील श्री नंदन भागवत,देवळे येथील श्री कल्पेश शिंदे, तुरळ येथील श्री शरद सावरटकर,कडवई येथील श्री विलास ओकटे, कळंबसते येथील महंमद शेठ दसुरकर, आणि देवरुख येथील श्री.विलास सावंत, तसेच कडवंई येथील श्रीमती साधना सुर्वे, आणि चोरवणे येथील सौ नम्रता कांबळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तर संघटनेच्या सल्लागार पदी जेष्ठ दुकान चालक, चिखली येथील श्री गंगाधर पंडित,मानसकोंड येथील श्री लक्ष्मण पाचकले, आणि साखरपा येथील जेष्ठ दुकान चालक श्री मधुकर माने यांनी बिनविरोध निवड करण्यात आली.
निवड करण्यात आलेल्या सर्वांचे जिल्हा अध्यक्ष श्री अशोकराव कदम यांनी स्वागत करून संघटनेच्या भावी करकीर्दीस शुभेच्या दिला. सभेच्या शेवटी उपस्थितांचे आभार श्री रोशन शिंदे यांनी मानले आणि सभेची सांगता झाली.