(रत्नागिरी)
शहरापासून १५ किमी अंतरावर असणाऱ्या उंबरवाडी कोतवडे ता. जि. रत्नागिरी येथे राहणाऱ्या संकेत चंद्रकांत परांजपे याने नुकत्याच झालेल्या सी. ए. अंतिम परीक्षेत यश संपादन केले आहे.
संकेत याचे 10 वी पर्यंतचे शिक्षण कोतवडे न्यू इंग्लिश स्कूल येथे झाले. त्यानंतर त्याने गोगटे – जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी येथून बॅचलर ऑफ अकाउंटिंग अँड फायनान्स या विषयातून त्याने ग्रॅज्युएशन पूर्ण केले. त्यानंतर एम कॉम ही पदवी सुध्दा त्याने प्राप्त केली. कोतवडे हायस्कूल चे त्यावेळचे मुख्याध्यापक श्री. प्रदिप तेंडुलकर सर यांनी कॉमर्स साईड ला जाणार म्हटल्यावर संकेत याच्यातील गुणवत्ता हेरुन पुढे सी. ए. होण्याचा सल्ला दिला. आणि संकेत ने सी. ए. व्हायचे ठरविले.
विशेष म्हणजे घरची आर्थिक परिस्थिती बेताची असताना संकेत याने उंबरवाडी येथील घरी राहून तसेच घरातील सर्व कामे करून त्याने सी. ए. चा अभ्यासक्रम पूर्ण केला. कुठेही प्रत्यक्ष ट्युशनला न जाता , केवळ ऑनलाईन लेक्चर व युट्यूब वरील ह्या अभ्यासक्रमाचे व्हिडिओ बघून व सातत्यपूर्ण व चिकाटीने अभ्यास करून तो सी. ए. अंतीम परीक्षा उत्तीर्ण झाला आहे. आर्टिकलशिप करताना मारुती मंदिर, रत्नागिरी येथील प्रसिद्ध सी. ए. श्री. हेरंब पटवर्धन सर व श्री. अभिजित पटवर्धन सर यांचे त्याला सी. ए. परीक्षेसाठी मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच संकेत याच्या आईं वडीलांनी व घरातील काका, काकू, चुलत भाऊ, आते, वहिनी प्रसिद्ध कीर्तनकार रोहिणी परांजपे (पुणे) तसेच गेल्या वर्षी निवर्तलेली आजी, शेजारील जोशी, गद्रे, परीवार तसेच संकेत चे मित्र मंडळ व हितचिंतक, नातेवाईक यांच्या भक्कम पाठिंब्याच्या जोरावर त्याने हे यश संपादन केले आहे. या बद्दल कोतवडे ब्रह्मवृंद मंडळ आणि कोतवडे पंचक्रोशी परिसरातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.