(नवी दिल्ली)
नव्या वर्षात म्हणजे 2024 U-19 World Cup 2024 मधल्या जानेवारी-फेब्रुवारीत होणाऱ्या आयसीसी अंडर-19 पुरुष विश्वचषकाचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. ही वर्ल्डकपची स्पर्धा दक्षिण आफ्रिकेत खेळवली जाणार आहे. या स्पर्धेत एकूण 41 सामने खेळवले जाणार आहेत. या विश्वचषकाची सुरुवात दक्षिण आफ्रिका आणि वेस्टइंडिजविरुद्धच्या सामन्याने होणार आहे.
टीम इंडियाचे वेळापत्रक
टीम इंडिया (Team India) असलेल्या ग्रुपमध्ये बांगलादेश, आयर्लंड, यूएसए आणि बांगलादेश संघांचा समावेश आहे. भारताचे ग्रुपमधले तीनही सामना ब्लोमफोंटेनमध्ये होणार आहेत. भारताचा ग्रुपमधला पाहिला सामना 20 जानेवारीला बांगलादेशविरुद्ध खेळवला जाणार आहे. तर दुसरा सामना 25 जानेवारीला आयर्लंडविरोधात आणि 28 जानेवारीला यूएसएविरोधात तिसरा सामना खेळवला जाणार आहे.
अंडर-19 विश्वचषक 2024 मध्ये एकूण 16 संघांचा समावेश असणार आहे. यामध्ये भारतासह अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, आयर्लंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, वेस्टइंडिज ,झिम्बाब्वे, नामिबिया, न्यूझीलंड, नेपाळ, स्कॉटलँड आणि यूएसए यांचा समावेश आहे.
ग्रुप A: भारत, बांग्लादेश, आयर्लंड, यूएसए
ग्रुप B: इंग्लंड, दक्षिण आफ्रीका, वेस्टइंडीज, स्कॉटलँड
ग्रुप C: ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, झिम्बाब्वे, नामिबिया
ग्रुप D: अफगाणिस्तान, पाकिस्तान, न्यूजीलँड, नेपाळ
अंडर-19 वर्ल्डकपसाठीचा भारतीय संघ
अर्शिन कुलकर्णी, आदर्श सिंह, रुद्र मयूर पटेल, सचिन धस, प्रियांशु मोलिया, मुशीर खान, उदय सहारन (कर्णधार), अरवेल्ली अवनीश राव (विकेटकीपर), सौम्य कुमार पांडे (उप-कर्णधार), मुरुगन अभिषेक, इनेश महाजन (विकेटकीपर), धनुष गौडा, आराध्य शुक्ला, राज लिम्बानी, नमन तिवारी.
ट्रॅव्हलिंग स्टँडबाय खिलाड़ी: प्रेम देवकर, अंश गोसाई, मोहम्मद अमान.
राखीव खेळाडू: दिग्विजय पाटिल, जयंत गोयत, पी. विग्नेश, किरण चोरमले
टीम इंडिया पाच वेळा चॅम्पियन
1988 पासून अंडर-19 वर्ल्ड कपचे आयोजन केले जात आहे. 1998 पासून दर दुसऱ्या वर्षी ही स्पर्धा आयोजित केली जाते. टीम इंडिया ही अंडर-19 विश्वचषक (Under 19 World Cup) इतिहासतील सर्वात यशस्वी टीम आहे. आतापर्यंत टीम इंडिया या स्पर्धेत पाच वेळा (2000, 2008, 2012, 2018 आणि 2022 मध्ये) चॅम्पियन बनली आहे. याशिवाय 2016 आणि 2020 मध्ये टीम इंडियाने उपविजेतेद मिळवलं होतं. ऑस्ट्रेलियाला तीनदा तर पाकिस्तानला दोनदा हे विजेतेपद मिळाले आहे. बांगलादेश, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांनीही प्रत्येकी एकदा ही ट्रॉफी जिंकली आहे.