(देवरुख)
देवरुख-संगमेश्वर मार्गांवरील साडवली साईनगर येथे बुधवारी सायंकाळी ७.३० वा. दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात देवरुख कांजीवरा येथील तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. नवीद युनूस कापडी (वय-३५, रा. कांजीवरा, देवरुख,) असे मृत तरुणाचे नाव आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, नवीद हा दुचाकीने देवरुखहून साडवलीच्या दिशेने जात होता. यावेळी साडवली साईनगर येथे अचानक गाय आडवी आल्याने दुचाकीवरील नियंत्रण सुटून दुचाकीचा भीषण अपघात झाला. यामध्ये नवीद याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर नवीद याला तात्काळ जवळच असलेल्या एका खासगी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.
नवीद हा हरहुन्नरी तरुण होता. टेम्पोद्वारे भाडे मारून तो प्रामाणिकपणे व्यवसाय करत होता. मात्र त्याच्या अपघाती मृत्यूने हळहळ व्यक्त केली जात आहे.त्याचा पश्चात आई, १ भाऊ, पत्नी, १ मुलगा असा परिवार आहे. नवीद हा देवरुखातील शिवसेना ठाकरे गटाचे कट्टर कार्यकर्ते इस्तीयाक कापडी यांचा लहान भाऊ आहे.