(लांजा)
बेकायदेशीर विनापरवाना जनावरांची वाहतूक करणाऱ्या राजापूर येथील दोघांना लांजातील शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी पकडून लांजा पोलिसांच्या ताब्यात दिले. या दोघांवर लांजा पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शुक्रवारी दुपारी व्हेळ फाटा ते पाचल मार्गावरील रिंगणे कोंड येथे घडली.
याबाबतची फिर्याद वेदांत विठ्ठल दळवी (२४, रा. आरगाव फौजदारवाडी) यांनी दिली आहे. नाझीम हुसेन फकीर (३५), आजीम हुसेन फकीर (४२, दोघेही रा. मूर, ता. राजापूर) अशी दोघांची नावे आहेत. व्हेळ ते पाचल मार्गावर बेकायदा व विनापरवाना जनावरांची वाहतूक होत असल्याची माहिती शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेच्या कार्यकर्त्यांना मिळाली होती. त्यानुसार शुक्रवारी दुपारी रस्त्यावर सापळा रचला होता. दुपारी २:४५ वाजण्याच्या दरम्यान रिंगणे कोंड या ठिकाणी एक गाडी (एमएच ०६, बीजी २८०१) आली. ती थांबवून तपासणी केली असता हौद्यात दोन बैल बांधलेले होते.