(रत्नागिरी)
निवळी – जयगड मार्ग हा दिवसरात्र वर्दळीचा मार्ग म्हणुन ओळखला जातो. या मार्गावर जास्त प्रमाणात जिंदाल आणि आंग्रे पोर्ट च्या अवजड वाहनांची जास्त वाहतूक होते. बरेचवेळी या अवजड गाड्यांमुळे जीवितहानीसुध्दा झाली आहे. मंगळवारी रात्री तिवराटनजीक वळणावर ओव्हरलोड गाडी डीझेल संपल्याने बंद पडली असतानाच त्या वळणावरील चढात दुसरी ओव्हरलोड गाडी ओव्हरटेक करीत असताना तीचेही डिझेल संपल्याने दोन्ही गाड्या वळणातच बंद पडल्या. यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतुकीचा खोळंबा झाला. दुतर्फा गाड्यांच्या रांगा लागल्या आणि वाहतुक बंद पडल्याने छोट्या गाड्यांचाही मार्ग बंद पडला होता.
या गाड्या पस्तीस टन पेक्षाही ओव्हरलोड वाहतुक करतात, अनेक कारणानी रस्त्यात, वळणात बंद पडतात. मात्र बरेच वेळा नागरिकांनी आवाज उठवुनही आरटीओ विभाग दुर्लक्ष करीत असल्याने आजही तीच चर्चा नागरिकांमध्ये होती. सदर ओव्हरलोड वाहतुकीचा विषय आरटीओ विभागाने गांभीर्याने घ्यावे, अशी या विभागातील लोकांची मागणी आहे.