(चिपळूण)
शहरानजीकच्या खेर्डी शिवाजीनगर येथे एका इमारतीच्या प्लास्टरचे काम सुरू होते. दोन कामगार दुसऱ्या माजल्यावरून पडून दोघांचाही मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. शुक्रवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, सुरेश मारुती शिगवण (३६, खेर्डी शिगवणवाडी) व पूनम दिलीप सहा (४०, खेर्डी शिवाजीनगर, मूळची बिहार) अशी मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत.
खेर्डी शिवाजीनगर येथे एका इमारतीच्या प्लास्टरचे काम सुरु होते. त्यासाठी दुसऱ्या मजल्यापर्यंत लाकडी पलांजा बांधण्यात आला होता. त्यातील एक बांबू तुटल्याने त्यावर उभे असलेले दोघेजण दुसऱ्या मजल्यावरून खाली कोसळले. त्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना तत्काळ नजीकच्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तेथे त्यांना मृत घोषित केले. मृत्यू झालेल्यापैकी एक खेर्डी येथील शिगवणवाडीतील असून दुसरा बिहारचा आहे.