(रत्नागिरी)
तटरक्षक दल, पोलिस आणि मत्स्य व्यवसाय विभागाने संयुक्त मोहीम राबवून मच्छीमार नौकांच्या कागदपत्रांची तपासणी केली. बुधवार आणि गुरुवारी ही संयुक्त मोहीम राबवण्यात आली. समुद्रमार्गे दहशतवादी आणि स्फोटके आल्याची प्रकरणे यापूर्वी घडली आहेत. या पार्श्वभूमीवर ही संयुक्त मोहीम राबवण्यात आली.
समुद्रमार्गे १९९५ साली शेकाडी बंदरात आरडीएक्स स्फोटके आली होती. त्याचबरोबर दहशतवादी कसाब आणि त्याचे सहकारीही समुद्रमार्गेच आले होते. या पार्श्वभूमीवर तटरक्षक दल, पोलिस आणि सहायक मत्स्य व्यवसाय आयुक्त विभागाकडून दरवर्षी सागरी कवच अभियान राबवले जाते. बुधवारी सकाळी ६ वाजता सुरू झालेले हे अभियान गुरुवारी संध्याकाळी ६ वाजता संपले.
सागरी कवच अभियानात मच्छिमार नौकांच्या परवान्यांची विविध कागदपत्रे तपासण्यात आली. त्याचबरोबर नौकांवरील परप्रांतीय खलाशांची ओळखपत्रे तपासून पडळणी करण्यात आली. याच मोहिमेदरम्यान दहशतवादी कारवायांसंदर्भात मच्छीमार नौकांवरील कामगार वर्गाची जनजागृतीसुद्धा करण्यात आली.