(खेड)
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर कशेडी बोगदा पार केल्यानंतर काही अंतरावर शनिवारी (दि. ११) रात्री ८:१० वाजण्याच्या सुमारास दोन कारची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात पाच जण जखमी झाले असून, कशेडी पोलिस मदत केंद्रातील कर्मचाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचून जखमींना रुग्णालयात नेण्याची व्यवस्था केली व वाहतूक पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न केले.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी बोगद्याजवळ शनिवारी रात्री ८:१० वाजण्याच्या सुमारास चिपळूण ते पाली जाणारी इनोव्हा कार (एमएच ४३-बीई ४८८९) आणि नेरूळ, नवी मुंबई ते चिपळूण येथे जाणारी झुंडाई एक्स्टर कार (एमएच ०६-सीपी २७२१) यांची समोरासमोर अपघातात रेश्मा धडक झाली. या इस्माईल फनकर वय ३८, रा. सुधाकर पाली, जि. रायगड), साजिदा हसरत डांगू (२६, रा. पुणे), माहीन आसरा डांगू (रा. पुणे), हनुमान लक्ष्मण शेट्ये (४६, रा. महाड, जि. रायगड) व समिधा सुहास मोरे (४६, रा. सुधाकर पाली, जि. रायगड) हे जखमी झाले.
अपघाताची माहिती मिळताच कशेडी महामार्ग पोलिस मदत केंद्रातील सहायक पोलिस फौजदार समीर सुर्वे, पोलिस कर्मचारी रामागडे घटनास्थळी पोहोचले. जखमींना रुग्णालयात पाठवून त्यांनी वाहतुकीची कोंडी होणार नाही याची खबरदारी घेतली. जखमींना नरेंद्र महाराज संस्थानच्या रुग्णवाहिकेने कळंबणीच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या अपघाताची नोंद पोलिसांनी केली असून, अधिक तपास खेड पोलिस करत आहेत.