(रत्नागिरी)
शहरात अल्पवयीन मुलीने केलेल्या आत्महत्या प्रकरणी पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला. पीडित मुलगी राहत असलेल्या घरातील मुलगा व आईवर छळ करुन आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप ठेवला आहे. त्यासंबंधीची तक्रार पीडित मुलीच्या आईने रत्नागिरी शहर पोलिसांत दाखल केली होती.
त्यानुसार पोलिसांनी ही कारवाई केली. शहरातील अल्पवयीन मुलीने २२ मार्च रोजी राहत्या घरी गळफासाने आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला होता. अल्पवयीन मुलगी राहात असलेल्या घरामध्ये संशयित आरोपी हे मारझोड करत होते. तसेच मानसिक छळ करत असल्याचे मुलीच्या आईने तक्रारीमध्ये नमूद केले आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.