(रत्नागिरी)
तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडियाच्या मान्यतेने तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र व बीड जिल्हा तायक्वांदो असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने 34 वी महाराष्ट्र राज्य ज्युनियर तायक्वांदो अजिंक्यपद स्पर्धा दि. 25 ते 27 जुलै दरम्यान बीड येथे संपन्न झाल्या. या स्पर्धेसाठी राज्यभरातून सुमारे 600 खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता.
सदर राज्य स्पर्धेत रत्नागिरी जिल्हा संघाचे प्रतिनिधित्व रत्नागिरी तालुक्यातील गणराज तायक्वांडो क्लबची त्रिशा हिने 42 ते 44 या वाजनी गटातमध्ये त्रिशा साक्षी सचिन मयेकर हिने अतिशय उत्कृष्ट कामगिरीचे प्रदर्शन करत सुवर्णपदक पटकावले. राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक पटकावलेल्या त्रिशा मयेकर हिची निवड 17 ते 20 ऑगस्ट दरम्यान संभाजीनगर (औरंगाबाद)येथे होणाऱ्या अजिंक्यपद राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्रिशाचे आतापर्यत ८ राष्ट्रीय स्पर्धत पदक व सहभाग नोंदवला आहे, तिला मार्गदर्शन करणाऱ्या प्रमुख महिला प्रशिक्षक सौ.आराध्या प्रशांत मकवाना, यांचे त्रिशाला मार्गदर्शन लाभत आहे.
त्रिशाला राज्याचे उद्योग मंत्री रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री श्री उदय सामंत सन्मानचिन्ह व राष्ट्रीय स्पर्धेकरीता शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ. अविनाश भाराजगे, सेक्रेटरी मिलिंद पाठारे, उपाध्यक्ष प्रविण बोरसे, धुळेछंद मेश्राम खजिनदार व्यंकटेशराव करा, रत्नागिरी जिल्ह्याचे सचिव लक्ष्मण करा, कोषाध्यक्ष शशांक घडशी, तायक्वांडो प्रशिक्षक राम के, मिलिंद भागवत, रत्नागिरी तायक्वॉंदो स्पोर्ट्स असोसिएशन, तायक्वॉंदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र चे सर्व पदाधिकारी, क्लबचे पदाधिकारी सौ.नेहा किर, अभिजित विलणकर, रंजना मोडूंळा, पुजा कवितके, कनिष्का शेरे, भगवान गुरव, साक्षी मयेकर व पालक वर्ग यांनी त्रिशाला राष्ट्रीय स्पर्धेकरीता शुभेच्छा दिल्या आहे.