( पाली / वार्ताहर)
महाराष्ट्र पोलिस सेवेची ३४ वर्षे सेवा पूर्ण करीत सुमारे ३० वर्षे विनाअपघात पोलीस चालक म्हणून सेवा बजावणारे दहशत विरोधी शाखेचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विजय नारायण कदम यांचा जिल्ह्याच्या अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. रत्नागिरी जिल्हा पोलिस दल व जिल्हा वाहतूक शाखा रत्नागिरी यांच्या अधिपत्याखाली ३६ वी रस्ता सुरक्षा अभियान २०२५ दरम्यान जनजागृती व प्रबोधन कार्यक्रमांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्यांचा नुकताच यथोचित सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.