( संगमेश्वर /प्रतिनिधी )
कडवई पंचक्रोशी शिक्षण मंडळाच्या भाईशा घोसाळकर हायस्कूल, कडवईमध्ये वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.कार्यक्रमाला संस्थेचे सचिव वसंत उजगावकर,आर्मी एन सी सी पी.आय स्टाफ,एम.डी. मेहबूब,महेश कुमार,एन सी सी थर्ड ऑफिसर संतोष साळुंके,मुख्याध्यापक शेषेराव अवघडे उपस्थित होते.
कार्यक्रम प्रसंगी हरित सेना विभागप्रमुख निलेश कुंभार यांनी विद्यार्थ्यांना वृक्षारोपणाचे महत्व पटवून दिले. विद्यार्थ्यांच्या सहकार्याने हे वृक्षारोपण पार पडले.यावेळी वड,पिंपळ,बदाम,जांभूळ अश्या बहुपयोगी वृक्षांचे रोपण करण्यात आले.या वृक्षांची काळजी घेण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांना वाटून देण्यात आली आहे.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्काऊट गाईड विभाग प्रमुख मिलिंद कडवईकर,प्रदीप कानाल,सिद्धी,सुर्वे,सूरज कदम,सोमनाथ कोष्टी,नयना गुजर,संतोष पुरोहित,संजय घोसाळकर,राजेश खेडेकर,प्रशांत साळवी व एन.सी.सी.कॅडेट यांनी मेहनत घेतली.