(संगमेश्वर)
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गांवर तुरळ हरेकरवाडी येथे दुचाकीला जोरदार बोलेरो चालकाने धडक दिली. या अपघातात दुचाकी चालक जागीच ठार झाला. याप्रकरणी बोलेरो चालकावर संगमेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
धामणी ते आरवलीच्या दिशेने सुसाट वेगात जाणाऱ्या बोलेरो वाहन चालक परेश हेमंत देवरुखकर याचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने विरुद्ध दिशेला जात दुचाकीला फरफटत नेले.होते यात दुचाकीस्वार विघ्नेश करंडे हा गाडीवरून काही अंतरावर उडून गेला व त्याचा जागीच मृत्यू झाला होता.
भरधाव वेगाने गाडी चालवणाऱ्या बोलेरो चालक परेश हेमंत देवरुखकर याच्यावर संमेश्वर पोलीस ठाण्यामध्ये भारतीय न्याय संहिता कलम 106(1)281,125( अ) ब, मोटर कायदा कलम 184 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे अधिक तपास संगमेश्वर पोलीस करत आहेत.