(दापोली)
अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ शाखा दापोलीच्या वतीने प्रांताधिकारी तसेच तहसिलदार दापोली यांना विधानसभा निवडणूकीचे प्रशिक्षण दिवाळी सुट्टीपूर्वी घेणेबाबत मंगळवारी अखिलचे तालुकाध्यक्ष विजय फंड यांनी निवेदन देत विनंती केली.
काही दिवसात विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता असल्यामुळे, दरम्यान सर्वांचा आवडता दिवाळीचा सण येत आहे. दिवाळी हा सण आपल्या महाराष्ट्रात अतिशय गोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो. तसेच दिवाळी सणानिमित्त रविवार दिनांक 27/10/2024 ते बुधवार 13/11/2024 या कालावधीत सर्व शाळांना सुट्टी असून,या सणासाठी शिक्षकांसह सर्व शासकीय कर्मचारी आपापल्या मूळ गावी जातात. अनेकांनी आपल्या मूळ गावी जाण्यासाठी दोन महिने अगोदरच बस किंवा रेल्वेचे बुकिंग केले आहे. त्यामुळे विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चे होणारे प्रशिक्षण दिवाळी सुट्टीपुर्वी आयोजित करावे असे निवेदनात म्हंटले आहे. यावेळी फंड यांचेसोबत भुपेंद्र तलाठी, भालचंद्र घुले वैभव बोरकर, आदि उपस्थित होते.