(मुंबई)
नागपुर जं ते मडगाव (गोवा) दरम्यान धावणाऱ्या व्दितीय साप्ताहिक विशेष रेल्वे रेल्वेबोर्डाच्या अंतिम निर्णयांच्या आदेशापर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे खान्देश,विदर्भ ते कोकण चालणारी रेल्वे रेल्वेबोर्डाच्या अंतिम निर्णयांच्या आदेशापर्यंत चालवली जाणार आहे. विशेष रेल्वेगाडीला सेवाग्राम जं,चांदुर,मूर्तीजापूर जं,नांदुरा,जळगाव जं,पाचोरा जं,चाळीसगाव जं,मनमाड जं,पेण,वैभववाडी रोड थांब्याची रेल्वे मंत्रालयाकडून अतिरिक्त थांब्याची मात्र प्रतिक्षाच असल्याचे राष्ट्रीय सरचिटणीस कोकण प्रांत श्री वैभव बहुतूले यांनी म्हटले आहे.
खान्देश,विदर्भातुन थेट कोकण रेल्वे मार्गावर येण्यासाठी उपलब्ध नसल्याने अशा रेल्वेची मागणी वारंवार रेल्वे प्रवासी संघटनांकडून केली जात होती मकर संक्रांत,महाशिवरात्र सणाच्या पार्श्वभूमीवर ०११३९/०११४० नागपुर जं ते मडगाव ही आठवड्यातून दोनदा धावणारी गाडी आता रेल्वे रेल्वेबोर्डाच्या अंतिम निर्णयांच्या आदेशापर्यंत चालवली जाणार आहे
सुधारित वेळापत्रकानुसार ही गाडी नागपुर जं ते मडगाव (गोवा) पर्यंत चालवली जाणार आहे त्यानुसार ही गाडी नागपुर जं ते मडगाव (गोवा) पर्यंत चालवली जाणार आहे त्यानुसार ही गाडी नागपुर जं येथून दर बुधवार,शनिवारी दु.०३.०५ वाजता सुटून गुरुवार,रविवारी मडगाव गोवा दुसऱ्या दिवशी सायं ०५.४५ वाजता पोहोचेल
मडगाव गोवा ते नागपुर जं दरम्यान धावताना हि गाडी ०११४० गुरुवार,रविवारी मडगाव गोवा येथून रा.०८.०१ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी रात्री ०९.४५ वाजता नागपुर जं येथे पोहोचेल
नागपुर जं. ते मडगाव (गोवा) या प्रवासात गाडी वर्धा जं,पुलगाव, धामणगाव, बडनेरा जं, अकोला जं,शेगांव, मलकापूर,भुसावळ जं,नाशिक रोड,ईगतपुरी,कल्याण जं,पनवेल जं,रोहा,माणगांव,खेड,चिपळूण,संगमेश्वर रोड,रत्नागिरी,राजापूर रोड,कणकवली,कुडाळ,सावंतवाडी रोड,थिवीम,करमाळी या स्थानकांवर थांबणार आहे या दर आठवड्याला या रेल्वेगाडीच्या दोन्हीकडून चार फेऱ्या होणार आहेत या रेल्वेसेवेचे संगणकीय आरक्षण www.enquiry.indianrail.gov.in,www.irctc.gov.in व NTES,Indian Rail Connect ॲपवर भारतीय रेल्वेच्या संगणकीय आरक्षण व आरक्षण खिडकीवर दि.२९ डिसेंबर २०२४ पासुन सुरु करण्यात आले आहे
नागपुर जं मडगाव नागपुर जं प्रतिक्षा व्दितीय साप्ताहिक एक्स्प्रेसचा अधिकाधिक प्रवाशांनी लाभ घ्यावा असे आवाहन रेल्वे प्रवासी सामाजिक संस्था कल्याण सावंतवाडी(रजि.) संस्थापक अध्यक्ष श्री.सुनिल उत्तेकर,पुणे कल्याण सावंतवाडी रेल्वे प्रवासी समिती मुंबई संस्थापक अध्यक्ष यशवंत परब,राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटना शेगांव(रजि.)सौ माधुरी शर्मा,राष्ट्रीय रेल्वे प्रवासी संघटना शेगांव अध्यक्ष राजकुमार व्यास,विदर्भ खान्देश मराठवाडा संपर्कप्रमुख तथा प्रांतप्रमुख श्री.वैभव बहुतूले,देवगड संपर्कप्रमुख ओमकार उमाजी माळगांवकर,कुडाळ ठाणे संपर्कप्रमुख चैतन्य धुरी,दापोली तालुकाध्यक्ष नागेश मयेकर,मंडणगड संपर्कप्रमुख संदेश गांधी बस प्रवासी संघटना शेगांवच्या कुमारी कुसुम चौहान,प्रवासी सुधीर राठोड,अनिल राठोड,दिपक सोनवणे,विदर्भ-खान्देश कृषी-मेडिकल विद्यापीठ-मेडिकल कॉलेजातील विद्यार्थी-विद्यार्थीनी वर्गाकडून करण्यात आले आहे