(चिपळूण)
मुंबई-गोवा महामार्गावर दोन आणि दहीवली येथे एक अशा तीन ठिकाणी अपघात झाले. यातील महामार्गावर कापसाळ-मोरेवाडी येथे झालेल्या अपघातात एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. तसेच, अन्य दोन अपघातांत एकजण जखमी झाला. किशोरी प्रमोद वेल्हाळ (५७, रा. खंड, चिपळूण) असे कापसाळ मोरेवाडी येथील अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.
महामार्गावरून कारचालक चंद्रशेखर गराटे (४८, रा. खेडर्डी) गाडी घेऊन जात असताना कापसाळ मोरेवाडी येथे अपघात झाला. किशोरी वेल्हाळ या दुचाकीवरून रस्त्याच्या उजव्या बाजूला जात असताना मागून कारची धडक बसून अपघात झाला. उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी चंद्रशेखर गराटे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. महामार्गावर मौजे आगवे येथे एका हॉटेलसमोर दुचाकीची कारला धडक बसून अपघात झाला. या अपघाताप्रकरणी दीपक बाबाजी गोसावी (२९, रा. नायशी, गोसावीवाडी, चिपळूण) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
दीपक गोसावी हा शुक्रवारी दुपारी २ वाजता दुचाकी (एमएच ०५, बीपी ५४५३) घेऊन जात होता. आंबतखोल जोड रस्त्याने महामार्गावर अचानक विरुद्ध दिशेने आला. त्यामुळे चारचाकी (एमएच ०७, वाय ७०२०) या गाडीला समोरून धडक दिली. तसेच दहिवली रस्त्यावर झालेल्या अपघातप्रकरणी दीपक जयसिंग कदम (४९, रा. साडवली संगमेश्वर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दीपक कदम चारचाकी (एमएच ०८, एपी ६७६४) ही गणेशखिंड ते सावर्डे अशा रोडने चालवित घेऊन येत होता.