(रत्नागिरी)
जिल्ह्यातील हजारो दिव्यांग बांधव आपल्यावर झालेल्या अन्याया विरोधात जिल्हा परिषद रत्नागिरी येथे सोमवार दि.२४ जून रोजी रत्नागिरी जिल्हा दिव्यांग समन्वय समितीच्या माध्यमातून धडक देणार आहेत.
जिल्हा परिषद कार्यालय रत्नागिरीकडे दिव्यांग ५ टक्के निधी उपलब्ध नसल्याने दिव्यांगांनी केलेले सर्व प्रस्ताव रद्द करून ग्रामसेवकांकडून परत दिव्यांगांना सुपूर्द करण्यात आले आहेत. प्रस्ताव सादर केलेले दिव्यांग बांधव आपल्याला साईड व्हील स्कूटर, झेरॉक्स मशिन, शिलाई मशिन, घरघंटी मिळेल या आशेवर होते; परंतु या आशेवर जगणाऱ्या दिव्यांगांना हे परत आलेले प्रस्ताव बघून धक्का बसला आहे. तसेच समाजकल्याण कार्यालयाच्या अशा मनमानी कार्यपध्दतीबद्दल दिव्यांग बांधवांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे. जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांमध्ये समाजकल्याणच्या या कृतीमुळे प्रचंड प्रक्षोभ निर्माण झाला आहे.
या अन्यायाविरुद्ध दाद मागण्यासाठी सोमवार दि. २४ जून रोजी जिल्हाभरातून हजारो दिव्यांग बांधव एकत्र येऊन दाद मागणार आहेत. दिव्यांगांच्या अनेक समस्या आहेत, त्यांना वाचा फोडण्यासाठी दिव्यांगांनी मोठ्या संख्येने दि. २४ रोजी सकाळ ११ वाजता जिल्हा परिषद रत्नागिरी येथे उपस्थित राहावे, असे आवाहन रत्नागिरी जिल्हा दिव्यांग समन्वय समितीचे जिल्हाध्यक्ष आनंद त्रिपाठी उपाध्यक्ष अशोक भुस्कुटे, कार्याध्यक्ष विजय कदम, सचिव अमित आडवडे यांनी केले आहे.
शासनाची दिव्यांग व्यक्तींकडे पाठ…
दरम्यान, लोकसभ निवडणुकीच्या धावपळीत शासनाने दिव्यांग व्यक्तींकडे पाठ फिरवल आहे. खूप जाचक अटींची पूर्तता करून अनाथ, गरीब, गरजू दिव्यांग व्यक्तींन तुटपुंज्या स्वरुपात मिळणाऱ्या संजव गांधी दिव्यांग पेन्शन योजनाच्य लाभार्थ्यांना या योजनेचे मानधन गेले तीन महिने मिळालेले नाही. ज्या गरीब गरजू अनाथ दिव्यांगांचा उदरनिर्वा याच पेन्शनवर होत आहे.