(नवी दिल्ली)
दूरसंचार विभागाने स्मार्टफोनबाबत मोठा निर्णय घेतला असून, त्याचा थेट परिणाम स्मार्टफोन वापरणाऱ्यांवर होणार आहे. फसवणूक आणि घोटाळ्यांची झपाट्याने वाढणारी प्रकरणे पाहता, केंद्र सरकारच्या दूरसंचार विभागाने 15 एप्रिलपासून USSD आधारित कॉल फॉरवर्डिंग सुविधा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबतच सरकारने टेलिकॉम कंपन्यांना कॉल फॉरवर्डिंगसाठी वेगळी व्यवस्था करण्यास सांगितले आहे.
15 एप्रिलनंतर, मोबाइल वापरकर्ते त्यांच्या फोनमध्ये कॉल फॉरवर्डिंग सुविधा वापरू शकणार नाहीत. तथापि, डीओटीने असेही म्हटले आहे की कॉल फॉरवर्डिंग सुविधा नंतर पर्यायाने सक्रिय केली जाऊ शकते. सध्या ही सुविधा 15 तारखेनंतर बंद होणार आहे. यासंदर्भात दूरसंचार विभागाकडून सर्व दूरसंचार कंपन्यांना सूचना पाठवण्यात आल्या आहेत.
USSD आधारित सेवा वापरण्यासाठी, स्मार्टफोन वापरकर्ते त्यांच्या फोन स्क्रीनवर एक विशेष गुप्त कोड डायल केला जातो. मात्र आता या सेवेतील कॉल फॉरवर्डिंग सेवा बंद करण्याचा निर्णय दूरसंचार विभागाने घेतला आहे. साधारणपणे, USSD आधारित सेवेद्वारे, लोकांना इतर अनेक माहिती मिळते जसे की IMEI नंबर जाणून घेणे, मोबाईल बॅलन्स जाणून घेणे इ. USSD आधारित सेवेमध्ये कॉल फॉरवर्डिंग सुविधा देखील उपलब्ध आहे.
या संदर्भात DOT ने 28 मार्च रोजी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे की, USSD आधारित कॉल फॉरवर्डिंग सुविधा अनेक प्रकारच्या अनुचित कामांसाठी वापरली जात असल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे. हे समजल्यानंतर १५ एप्रिलनंतर ते बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. डीओटीने आदेशात म्हटले आहे की ज्यांनी कॉल फॉरवर्डिंग सुविधा सक्रिय केली आहे त्यांना दुसरा पर्याय दिला जाऊ शकतो.