(संगमेश्वर / प्रतिनिधी)
रत्नागिरी जिल्हा हिंदी शिक्षक मंडळाच्या वतीने आयोजित हिंदी दिन पखवाडा समापन समारोह चिपळूण येथील माधव सभागृह येथे उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी आर.सी. काळे विद्यालय,पेढेच्या विद्यार्थिनींनी ईशस्तवन व स्वागतगीत सादर केले.त्यानंतर देश की लाडली बेटी : हिंदी ही नाटिका सादर करण्यात आली.या कार्यक्रमात जिल्ह्यातील नऊ शिक्षकांना कृतिशील हिंदी शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.उदय पाटील, बॅ. नाथ .पै विद्यालय व ज्युनिअर कॉलेज हर्चे, श्री. राजेश माळी ह.भ. प श्री.आ.बा सावंत माध्यमिक विद्यालय नायशी, मंजिरी शितूत, पूज्य साने गुरुजी विद्या मंदिर पालगड, वैशाली कोदारे न्यू इंग्लिश स्कूल खवटी, प्रदिप पवार, स्वामी समर्थ माध्यमिक विद्यालय,देऊड, जिभाऊ पवार श्री सिध्दीविनायक विद्यालय, मुंढर, मुरलीधर खानविलकर माध्यमिक विद्यामंदिर ओझर, ता.राजापूर, अनिता भोकरे, वेसवी हायस्कूल, ता.मंडणगड, मनोहर कनावजे, माध्यमिक विद्यालय दाभोळे, ता.संगमेश्वर. शिक्षकांसाठी घेण्यात आलेल्या निबंध लेखन स्पर्धेत मधुरा सिनकर – प्रथम,मिनल खानविलकर -द्वितीय,सुहास तानाजी गेल्ये – तृतीय, सचिन अशोक पोकळे – उत्तेजनार्थ.या स्पर्धेचे परीक्षण प्रा.रामचंद्र माने यांनी केले.
शिक्षकांसाठी घेण्यात आलेल्या कविता लेखन स्पर्धेत मधुरा सिनकर – प्रथम ,अजित जाधव – द्वितीय,सुहास गेल्ये – तृतीय, मुजावर शब्बीर – उत्तेजनार्थ. या स्पर्धेचे परीक्षण प्रा.विलास व्हावळ यांनी केले.विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या कथाकथन स्पर्धेत श्रेया मिस्त्री प्रथम, सलीम खान द्वितीय कीर्ती निकम तृतीय, गौरी गोरे उत्तेजनार्थ. या स्पर्धेचे परीक्षण मधुरा सिनकर व रमाकांत पवार यांनी केले.
या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक प्रा.जयसिंग चवरे म्हणाले की, जागतिक स्तरावर हिंदीचे महत्व वाढत चालले आहे. २१ व्या शतकात भारत एका मोठ्या अर्थव्यवस्थेच्या रुपात विकसित होणारा देश मानला जातो.हिंदी ही विश्व स्तरावर सर्वात जास्त बोलली जाणारी तिसरी भाषा आहे.त्याचबरोबर त्यांनी तकनीकी हिंदी, मीडिया आणि वेब वर हिंदी या संदर्भात मार्गदर्शन केले. राज्याध्यक्ष अनिलकुमार जोशी यांनी नवीन शैक्षणिक धोरणात पाचवी हिंदी बंद केली जाणार आहे.त्यासाठी आंदोलन करावे लागेल. हिंदी वाचविण्यासाठी सामूहिक प्रयत्नाची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना जिल्हाध्यक्ष मिलिंद कडवईकर यांनी जिल्हा संघटना करत असलेल्या कामाचा आढावा घेतला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन परवेझ सर यांनी केले तर आभार प्रदर्शन मानसी पेढांबकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्याध्यक्ष राजेंद्र खांबे, सहसचिव आशिष सरमोकादम, सलिमा नदाफ, राखी भुरण, उज्वला लोखंडे, मुग्धा पवार, बेंडाले, सावर्डेकर, माळी, साठ्ये, माने यांनी मेहनत घेतली.