(रत्नागिरी)
शहरातील उद्यमनगर येथे चोरट्यांनी घरफोडी करून 66 हजार रूपयांचा ऐवज लांबवल़ा. ही घटना 19 ते 25 फेब्रुवारी दरम्यान घडल़ी. मुसैब मकसूद बुडये (30, ऱा पडवेकर कॉलनी, उद्यमनगर रत्नागिरी) यांनी याप्रकरणी शहर पोलिसांत तक्रार दाखल केल़ी. त्यानुसार पोलिसांनी अज्ञातांविरूद्ध गुन्हा दाखल केल़ा आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुड्ये यांचे उद्यमनगर पडवेकर कॉलनी येथे घर आह़े. 19 ते 25 फेब्रुवारी 2024 या काळात चोरट्यांनी घराच्या खिडकीची स्लाईडींग काच सरकवून आतमध्ये प्रवेश करून कपाटातील लॉकरमध्ये ठेवलेले दागिने चोरून नेल़े, अशी तक्रार शहर पोलिसांत दाखल करण्यात आल़ी. चोरीला गेलेल्या मुद्देमालामध्ये 2 तोळे वजनाचा सोन्याचा हार, 6 ग्रॅम वजनाची सोन्याची कानातील टॉपची जोडी, 4 ग्रॅम वजनाची सोन्याची चेन, 3 ग्रॅम वजनाची सोन्याची कानातील छोटी रिंग जोडी आदींचा समावेश आह़े.
मुसैब बुडये यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी चोरट्यांविरूद्ध भादंवि कलम 380,454, 457 नुसार गुन्हा दाखल केल़ा आहे. याप्रकरणी पोलिसांकडून चोरट्यांचा शोध घेण्यात येत आह़े.