(मुंबई)
मार्च महिना संपायला अगदी काही दिवस उरले आहेत. यानंतर एप्रिल सुरू होईल. अशातच 1 एप्रिलपासून पैशांशी संबंधित 6 नियमांमध्ये बदल होणार आहेत. यामध्ये क्रेडिट कार्डच्या नियमांपासून ते NPS नियमांपर्यंत सर्व गोष्टींचा समावेश आहे. पुढील महिन्यापासून कोणते नियम बदलत आहेत ज्याचा थेट परिणाम तुमच्यावर होणार आहे ते पाहुयात…
पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी NPS गुंतवणूकदारांना सायबर फसवणुकीपासून वाचवण्यासाठी द्विस्तरीय सुरक्षा प्रणाली लागू करणार आहे. या अंतर्गत दोन घटक आधार-आधारित प्रमाणीकरण सुरू केले जाणार आहे. हे सर्व पासवर्ड-आधारित वापरकर्त्यांसाठी अनिवार्य असणार आहे. हा नवीन नियम 1 एप्रिल 2024 पासून लागू होणार आहे.
SBI क्रेडिट कार्डमध्ये बदल होणार :
SBI बँकेच्या क्रेडिट कार्डने जाहीर केले आहे की, काही विशिष्ट क्रेडिट कार्डांद्वारे भाडे देयांवर रिवॉर्ड पॉइंट्स 1 एप्रिल 2024 पासून थांबतील. यामध्ये AURUM, SBI Card Elite Advantage, SBI Card Elite, SBI Card Plus यांचा समावेश आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे क्रेडिट कार्डांवर भाड्याच्या पेमेंटवर रिवॉर्ड पॉइंट मिळणे हे 15 एप्रिल 2024 पासून बंद होणार आहे.
OLA मनी वॉलेट :
OLA Money ने जाहीर केले की, 1 एप्रिल 2024 पासून प्रति महिना 10,000 रुपयांच्या कमाल वॉलेट लोड मर्यादेसह लहान PPI (प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट) वॉलेट सेवांवर पूर्णपणे स्विच करत आहे. कंपनीने आपल्या ग्राहकांना एसएमएस पाठवून याची माहिती देखील दिली आहे.
ICICI बँक लाउंज अक्सेस :
ICICI बँकेने एयरपोर्ट लाउंज प्रवेशाच्या अटींमध्ये बदल करण्याची घोषणा केली आहे. 1 एप्रिल 2024 पासून सुरू होणाऱ्या तिमाहीत ग्राहकांना किमान 35,000 रुपये खर्च करावे लागणार आहेत. यानंतरच पुढील तिमाहीसाठी एयरपोर्टवरील लाउंजचा मोफत प्रवेश अनलॉक केला जाईल.
Yes बँक लाउंज प्रवेश लाभ :
Yes बँकेने नवीन आर्थिक वर्षापासून आपल्या देशांतर्गत लाउंज प्रवेश लाभांच्या धोरणांमध्ये बदल केले आहेत. तसेच पुढील तीन महिन्यांत सर्व ग्राहकांना लाउंजमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी चालू तिमाहीत किमान 10,000 रुपये खर्च करावे लागणार आहेत.
Follow us on Google News : https://news.google.com/s/CBIw9dzq7KQB?sceid=IN:en&sceid=IN:en&sceid=IN:en&r=0&oc=1