(संगमेश्वर / एजाज पटेल)
कांटे गावातील शालेय मुलींना पळवुन नेण्याचा प्रकार घडत असल्याची क्लिप सोशल मिडियावर व्हायरल झाल्याने सर्वत्र खळबल उडाली होती. यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर लांजा पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांनी मुलींना पळवून नेत असल्याची ती व्हायरल झालेली क्लिप चुकीची व बदनामीकारक असल्याचे सांगत कोणीही घाबरू नये असे आवाहन केले आहे.
व्हायरल झालेल्या क्लिपबाबत लांजाचे पोलिस निरिक्षक निळकंठ बगळे यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले की, सदर ठिकाण लांजा पोलीस स्थानकाच्या हद्दीमध्ये येत नाही. तरीदेखील शाळेत जाऊन आम्ही खात्री केली, तसेच संगमेश्वर पोलिस हद्दीमध्ये तळेकांटे गाव येत असल्याने तेथेही खात्री करण्यात आली. पंरतु कोठेही असा प्रकार घडलेला नाही. त्यामुळे संबंधित क्लीप चुकीची आणि बदनामीकारक असल्याचे दिसते आहे.
लांजा तालुकाच नव्हे तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कोठेही असा प्रकार घडलेला नाही. त्यामुळे कोणीही घाबरू जाऊ नये असे आवाहन लांजा पोलीस स्थानकाचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांनी केले आहे.