(राजापूर / तुषार पाचलकर)
राजापूर तालुक्यातील पाचल येथील पाचल पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा पाचल येथील सरस्वती विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयातील वाडिया हॉल येथे आज रविवार दिनांक आठ सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता आयोजित करण्यात आली होती, परंतू मान. जिल्हाधिकारी रत्नागिरी यांचेकडील आदेश क्रमांक उचिशा/ पोल -2/मनाई आदेश 2024 दिनांक 05 /09/2024 अन्वये महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951चे कलम 37(1)(3)आदेश परीत करण्यात आला असल्याने तसेच संस्थेच्या इतर सभासदांचा या सभेला विरोध असल्याने पाचल पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ पाचल या संस्थेची आजची वार्षिक सर्वसाधारण सभा रद्द करण्यात आल्याची संस्थेचे सहसचिव किशोरभाई नारकर यांच्याकडून देण्यात आली आहे.
सभा रद्द झाली असली तरी कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये तसेच मनाई आदेश लागू झाल्याने राजापूर पोलीस प्रशानाकडून आज सकाळी 8 वाजल्यापासून सरस्वती विद्यामंदिर, व कनिष्ठ महाविद्यालय पाचल प्रशालेच्या परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सदरचा मनाई आदेश 17 सप्टेंबर 2024 पर्यंत लागू करण्यात आला आहे.