(जैतापूर / वार्ताहर)
जैतापूर येथील तीव्र उतारावर झिगझॅग पद्धतीने स्पीड ब्रेकर टाकण्यात आले होते. यामुळे अनेक वेळा अपघात घडण्याबरोबरच वाहन चालकांमध्ये वादावादीचे प्रसंग सातत्याने घडत होते. या चुकीच्या पद्धतीने टाकलेल्या स्पीडब्रेकर विरोधात 15 ऑगस्ट 2023 ला स्वातंत्र्यदिनी आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला होता. त्यानंतर पावसाळा संपल्यानंतर ते स्पीड ब्रेकर काढून टाकू असे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मिळालेल्या लेखी पत्रानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले होते. मात्र या चुकीच्या पद्धतीने टाकलेल्या स्पीडब्रेकर वर कारवाई होईपर्यंत आपला लढा सुरूच राहील असेही म्हटले होते.
सार्वजनिक बांधकाम विभागाने दिलेल्या लेखी आश्वासनानुसार जैतापूर तीव्र उतारावरील झिगझॅग पद्धतीचे सर्व स्पीडब्रेकर काढून टाकण्यात आले असून या मार्गावर प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ज्या ठिकाणी उतार संपतो त्या ठिकाणी हायस्कूल असल्यामुळे आणि तीव्र उतार असल्याने केवळ तीन स्पीडब्रेकर तेही सलग ठेवण्यात आले आहेत.
झिकझॅक पद्धतीचे स्पीडबेकर काढले असले तरी देखील सर्व वाहन चालकांनी वेगावर नियंत्रण ठेवून कोणाला धोका होणार नाही अशाच पद्धतीने वाहने चालवावीत असेही आवाहन करण्यात आले आहे. हे स्पीड ब्रेकर काढून टाकल्यामुळे अनेक वाहन चालकांनी समाधान व्यक्त केले आहे. यापूर्वी जैतापूर- हातिवले या महामार्गावरील देखील जवळपास पंधरा ते वीस बेकायदेशीर स्पीड ब्रेकर काढून टाकण्याच्या त्यांच्या मागणीला यश मिळालेले आहे
तीव्र वित्तारावर चुकीच्या पद्धतीने टाकलेल्या या स्पीडब्रेकरच्या आंदोलनाला अनेकांनी पाठिंबा दिला होता. पाठिंबा दिलेल्या सर्वांचे आणि सार्वजनिक बांधकाम राजापूर विभागाच्या अधिकाऱ्यांचेही आभार पत्रकार राजन लाड यांनी मानले आहेत