(गावखडी / वार्ताहर)
हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असणारे रत्नागिरी तालुक्यातील मेर्वी ( भूतेवाडी ) येथील जागृत देवस्थान भगवतीदेवीचा यात्रोत्सव सोमवार दिनांक 13 जानेवारी 2025 रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. या यात्रोत्सवात निमित्त या दिवशी सकाळी देव्हारा मध्ये भगवती देवीचे मुखवटे लावून देव्हारा भक्तगणां च्या दर्शनासाठी भक्तीमय वातावरणात मंडपात आणला जातो.
या यात्रोत्सवात निमित्त मंडळाच्यावतीने रविवार दिनांक 12 जानेवारी 2025 रोजी विद्यार्थ्यांच्या निबंध स्पर्धा, विविध खेळ आयोजित करण्यात आल्या होत्या. सोमवार दिनांक 13 जानेवारी 2025 रोजी भूतेवाडीतील महिलामंडळातर्फे दुपारी ठिक तीन वाजता हळदीकुंकू समारंभ आयोजित करण्यात आला असून भूतेवाडीतील भाऊबंदकी तर्फे रात्रौ 12 वाजता भगवती देवीचा गोधळ घातला जाणार आहे.
या यात्रोत्सवाची सांगता दुसर्या दिवशी सकाळीच ठिक अकरा वाजेपर्यंत केली जाते. या सर्व कार्यक्रमाचा व भगवती देवीच्या दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन भगवतीदेवी ग्रामस्थ मंडळाच्या वतीने श्री. हरिश्चंद्र भूते आणि दिपक भूते आणि मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांकडून केले आहे. या यात्रोत्सवात लागणारे पूजा साहित्य, देवीची ओटी, खेळणी, प्रसाद, विविध खाद्यपदार्थ दुकाने व्यापारी थाटतात. यात्रोत्सव निमित्त आर्थिक उलाढाल होत असते.