(चिपळूण)
बाजारपेठेतील युनायटेड क्लासिक कॉम्प्लेक्समधील तेजस गारमेंटमधील कापड दुकानाच्या गोडावूनमधील कपडे चोरीला गेल्याचा प्रकार शनिवारी सायंकाळी उघडकीला आला. दुकानातील कामगारानेच सुमारे ३० हजारांचे कपडे चोरताना मालकाने रंगेहाथ पकडले.
मस्तकीम शब्बीर दाडेळ असे गुन्हा दाखल केलेल्या कामगाराचे नाव आहे. याबाबतची फिर्याद इंद्रजितसिंह हरनामसिंह गलाटी (६२) यांनी दिली आहे. शनिवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास कपड्याच्या गोडावूनमधील कपडे चोरून घेऊन जाताना कामगार मुस्तकीम शब्बीर दाडेळ याला पकडले. सुमारे ३०,२२८ रुपये किमतीचा हा माल असून, पोलिसांनी भारतीय न्यायसंहिता कायदा २०२३ चे कलम ३०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास चिपळूण पोलीस करत आहे.