(संगमेश्वर)
तालुका कुंभार समाज युवा आघाडीच्या वतीने कुंभार प्रीमियर लीगचे आयोजन पाटगाव येथे करण्यात आले होते. या स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभाच्या वेळी कुंभार समाज महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष महेशदादा सायकर म्हणाले की, संगमेश्वर युवा आघाडीचे कार्य कौतुकास्पद आहे.
दिनांक १ ते २ मार्चच्या दरम्यान सांब मंदिर पाटगाव येथे क्रिकेट लीगचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत एकूण आठ संघ सहभागी झाले होते.या संघाच्या माध्यमातून कुंभार समाजातील एकूण १२० खेळाडूंनी सहभाग घेतला.स्पर्धेत यशस्वी कामगिरी करत ‘कुंभार टायगर्स’ संघाने विजेतेपदावर नाव कोरले तर ‘गणेश स्पोर्ट्स’ संघाने उपविजेतेपद पटकावले. तृतीय क्रमांक ‘अन्विका स्पोर्ट्स’ संघाला मिळाला तर ‘अजिंक्य ११’ संघाने चतुर्थ क्रमांक प्राप्त केला.
स्पर्धेच्या पहिल्या दिवशी जिल्हाध्यक्ष सुभाष गुढेकर व जिल्हा सचिव प्रकाश साळवी यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले. पहिलेच पर्व असूनसुद्धा स्पर्धेचे उत्तम नियोजन केल्याबद्दल युवा आघाडी तालुकाध्यक्ष प्रथमेश साळवी यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांचे कौतुक केले.
स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी महेशदादा सायकर, भाऊ साळवी-संस्थापक अध्यक्ष संगमेश्वर तालुका कुंभार समाज, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष रवींद्र शिरकर, जिल्हा युवक आघाडी अध्यक्ष महेश पडवेकर, कार्याध्यक्ष पंढरीनाथ मायशेट्ये, जिल्हा सचिव सुधीर जामसुतकर, चिपळूण तालुकाध्यक्ष दिनेश वहाळकर, जिल्हा उपाध्यक्ष सुनील साळवी, पदाधिकारी प्रदीप शिरकर, अनिल पडवेकर या सर्व मान्यवरांनी पारितोषिक वितरण कार्यक्रमाला उपस्थिती लावली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश कुंभार यांनी केले. या स्पर्धेसाठी युवा आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी व क्रिकेट कमिटीने विशेष मेहनत घेतली, त्याचबरोबर देवरूख कुंभारवाडी,पाटगाव कुंभारवाडी व मंथन ग्रुपने विशेष योगदान देऊन स्पर्धा यशस्वी केली.
Follow us on Google News : https://news.google.com/s/CBIw9dzq7KQB?sceid=IN:en&sceid=IN:en&sceid=IN:en&r=0&oc=1