(रत्नागिरी / प्रतिनिधी)
युरोप नेदरलँड्समधील In- ternational Institute of Social Studies या कॉलेज मधुन इंटरनॅशनल डेव्हलपमेंट मध्ये मास्टर्स केले आहे. मी आम आदमी पक्षाचा रत्नागिरी अध्यक्ष आहे, आणि माझे आदर्श मा.अरविंद केजरीवाल आहेत.
मागील ३ वर्षांपासून, आम आदमी पक्षाच्या माध्यमातून जनसामान्यांचे प्रश्न आणि शासनाने केलेल्या कामांचा दर्जा यांचा आढावा घेत, आपल्या भागातील आवश्यक सुविधा आणि विकासासाठी एक अभ्यासू विरोधी पक्ष नेत्याप्रमाणे कार्यरत आहे. माझा छंद लोकसेवा करणे आणि भ्रष्टाचाराविरुद्ध लढणे आहे. रत्नागिरी विधानसभा मतदार संघातून आपला आमदार होण्यासाठी, मी अपक्ष उमेदवार म्हणुन निवडणूक लढवित आहे. मी अपक्ष उमेदवार म्हणून रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून आपल्या समर्थनासाठी माचिस हे चिन्ह घेऊन निवडणुकीस उभा आहे, आपल्या कुटुंबाच्या उज्वल भविष्यासाठी आपले अमूल्य मत मागत आहे.
पाटील यांनी आपल्या जाहीरनाम्यात प्रसिद्ध केलेले मुद्दे असे आहेत १) रत्नागिरी मतदार संघात कायम स्वरूपाचे युरोपियन स्टैंडड रस्ते, पुर्ण शहरात फुटपाथ, घर तेथे पाणीपुरवठा आणि वीज उपलब्ध करून देणार, सर्वसामान्य प्रवासी जनतेसाठी रात्र निवारा केंद्र उभारणार. २) रत्नागिरी शहरात बस स्टैंड, बस थांबे, वाहन पार्किंगची सुविधा, घनकचरा निवारण केंद्र, सांडपाण्यासाठी भूमिगत गटारे आणि प्रक्रिया प्रकल्प. ३) तसेच दिवस-रात्र नागरी वाहतूक सेवा उपलब्ध करून परफेक्ट रत्नागिरी शहर घडवणार. रत्नागिरी मतदार संघागत शैक्षणीक व वैद्यकीय सेवेचा कायापालट दिल्लीतील के जरीवाल सरकारच्या मार्गदर्शना खाली करणार. ४) रत्नागिरीतील पर्यटन क्षेत्राचा विकास करून पर्यटन व्यवसायाला चालना देऊन नविन रोजगार, बाजार पेठ निर्माण करणार आणि रत्नागिरीला पर्यकटांची पहिली पसंद करून रत्नागिरीला पर्यटकांची राजधानी बनवणार. ५) रत्नागिरी मतदार संघात आंबा, काजू, फणस, रातांबा यांसारख्या फळांसाठी विशेष बाजारपेठ उभारणार, तसेच प्रक्रियाद्वारे उत्पादन विक्रीसाठी राज्यस्तरीय बाजारपेठ उपलब्ध करून देणार. ६) मच्छीमारांसाठी मिरकरवाडा येथील जेटीचे आधुनिकीकरण करून कोल्ड स्टोरेज, इंधन केंद्र, आणि स्वयंचलित यंत्रसामग्रीसह आधुनिक सर्व सोयीनियुक्त मच्छी बंदर जेटी उभारणार.
७) रत्नागिरीतील तरुण शिक्षण पुर्ण करून नोकरीच्या शोधात मुंबईत जातो, त्यांचे करीता मुंबईतील नोकरी रत्नागिरीत आणणार, दरवर्षी ३००० नोकरीच्या संधी उभारणार. ८) मागील काळात गुणवत्ताहीन सार्वजनिक कामांची चौकशी करून दोषी ठेकेदार, अधिकारी, लोक प्रतिनिधीवर विरुद्ध कायदेशीर कारवाई करणार. ९) कायम रखडलेले प्रश्न अंगणवाडी, आशाताई सेविका, बचत गट, कंत्राटी कामगार, फेरीवाले, छोटे मच्छीमार, एसटी कर्मचारी, ऑटो रिक्षा, सावकारी कर्जदार, वैद्यकीय व्यवसायिक, हायकोर्टाची कोकण बेंच या बाबतचे प्रश्न पहिल्या १०० दिवसांत कायम स्वरुपी सोडविणार. १०) आमदार म्हणून निवडून आल्यावर एका महिन्यात आमदार एक खिडकी योजना सुरू करणार, तेथे सर्व शासकीय योजनांचा लाभ, नागरिकांना भ्रष्टाचार विना थेट मिळवून देणार. आमदार झाल्यास, आमदारकीचे पेंशन घेणार नाही.