(दापोली)
दिनांक 23/02/2025 रोजी श्री राम क्रिकेट क्लब वेळवी रामवाडी, ता. दापोली आयोजित श्री राम चषक-२०२५ ही क्रिकेट स्पर्धा वसई ( पश्चिम ) सन सिटी मैदानात घेण्यात आली होती. या क्रिकेट सामन्यांचे नियोजन श्री राम क्रिकेट क्लब वेळवी रामवाडी यांनी केले. या सामन्यांसाठी संघर्ष प्रतिष्ठान संलग्न पंचक्रोशी क्रिकेट विभाग, दापोली यांचं सहकार्य लाभले. विशेषता या सामन्यांनसाठी वेळवी रामवाडी ग्रामस्थ मंडळाचे पदाधिकारी श्री. राजेंद्र खांबल, श्री.अर्जुन जाधव, श्री. अनिल राहिराशी, श्री. अजित गायकर, श्री.जयेंद्र जांभळे, श्री.दिपक खामकर, श्री. विनायक खांबल, श्री.सुधीर राहिराशी, श्री. जयंत जाधव. उपस्थिती होते.
संघर्ष प्रतिष्ठान संलग्न पंचक्रोशी क्रिकेट विभाग, दापोली यांचे सचिव श्री. प्रदीप म्हाब्दी उपस्थित होते. श्री राम क्रिकेट क्लब वेळवी रामवाडीची पूर्ण टीम, कर्णधार श्री. पंकज रांगले, जय रांगले, माजी कर्णधार श्री. एकनाथ राहिराशी, सर्व संघ आणि पदाधिकारी उपस्थित होते.
या स्पर्धेतील सांघिक तसेच व्यक्तिगत पारितोषिक विजेते पुढीलप्रमाणे
१) प्रथम विजेता संघ-मुरुबाईदेवी क्रिकेट संघ बोंडिवली
२) द्वितीय विजेता संघ- 11स्टार अबगुलवाडी
3) मालिकावीर -श्री गणेश झिमण (बोंडिवली)
4) उत्कृष्ट फलंदाज – श्री विकास राजे (अबगुलवाडी)
5) उत्कृष्ट गोलंदाज – श्री निलेश झिमण (बोंडिवली)
6) इमर्जिंग प्लेयर -कु शंतनू राजपुरे (राजपुरे वाडी)
सर्व सांघिक विजयी संघांचे तसेच व्यक्तिगत पारितोषिक विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन करण्यात आले. तसेच स्पर्धेत सहभागी सर्व संघाच्या सहकार्याबद्दल आभार मानण्यात आले. तसेच पंचक्रोशीतील सर्व देणगीदारांचे तसेच पंच काम केलेल्या सर्व खेळाडूंचे, पंचक्रोशी क्रिकेट कमिटीचे तसेच पंचक्रोशीतील आम्हांला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार्य केलेल्या सर्व खेळाडूंचेही श्री राम क्रिकेट संघ वेळवी रामवाडी यांचेकडून यावेळी आभार मानण्यात आले.