(खेड / भरत निकम)
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरी करणाचे काम सध्या सुरू आहे. या चार पदरी रस्त्याकरिता रुंदीकरण, काँक्रिटीकरण, नवे पूल उभारणी ची कामे सुरू आहेत. भरणे ते वेरळ या दोन गावांच्या दरम्यान वाहणाऱ्या जगबुडी नदीवर महामार्ग विभागाने पूर्वी जुन्या पुलासाठी एक नवीन पूल उभारला आहे. त्यानंतर रस्ता काँक्रिटीकरण करताना आणखी एक पूल उभा राहिला आहे. तेथे नव्याने पाच खांब असलेल्या पुलाची निर्मिती केटीआयएल या ठेकेदार कंपनीने केली आहे.
पुलाच्या खांबावरती गर्डर टाकण्याकरता मोठमोठ्या क्रेन त्यावेळी आणल्या होत्या. कोविडच्या लॉकडाऊन काळात हे काम पूर्ण करण्यात आले होते. पुलाच्या बाजूचे काँक्रिट रस्त्याची कामे पूर्ण झाल्यानंतर हा नवीन पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता. या नव्या पुलाची तपासणी शासनाच्या केंद्र व राज्य सरकारमधील सगळ्या विभागांनी केली आहे. रस्त्यावरील वाहतूक दिमाकदारपणे सुरू असताना हा पूल वाहतुकीस सोयीस्कर ठरत होता.
गेल्या अनेक महिन्यांपासून पुलाची वाहतूक सुरळीत पणे सुरू होती. लहान मोठ्या वाहनांची ये जा सुरू झाली असतानाच, खेडचे माहिती अधिकार कार्यकर्ते रुपेश पवार यांनी काही दिवसांपूर्वी जगबुडीवरील पुलाची वाहतूक धोकादायक बनल्याची तोंडी तक्रार राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे केली. परंतु, महामार्ग विभाग अधिकाऱ्यांनी त्या तक्रारीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. तसेच ही तक्रार म्हणजे चेष्टा मस्करी असल्याचा समज त्यांनी त्यावेळेस करून घेतला होता. त्यानंतर कामाचे ठेकेदार केटीआयएल कंपनीकडेही पुलावरील पडलेल्या खड्ड्यांबाबत वारंवार चर्चा केली होती. मात्र ठेकेदार कंपनी व रस्त्याच्या देखरेखीखाली काय करणाऱ्या ब्लू कंपनीने या तक्रारींची दखल घेतली नव्हती.
रविवारी संध्याकाळपर्यंत पुलावरील वाहतूक सुरू होती. या नव्या पुलावरील पुलास जोडलेल्या सांध्यावरील गर्डर मध्ये भला मोठा खड्डा पडल्याचे लक्षात आले होते. यामध्ये अवजड वाहने जाताना पुलाचा गर्डर खूपच खाली वर होत होता. त्यामुळे महामार्गावरील वाहतूकीस धोका असल्याचे माहिती पवार यांच्या लक्षात आले. त्यांनी थेट खेळ पोलीस ठाण्यात याची माहिती दिली. महामार्गावरील पुलाबाबत गंभीर तक्रार आल्याने पोलीस निरीक्षक नितीन भोईर यांनी स्वतः सहकाऱ्यांसह पुलावर जाऊन वस्तुस्थिती पाहिली. त्यावेळी पुलाचा गर्डर अवजड वाहनांमुळे हलत असून पुलाला धोका असल्याचे पोलीस खात्याच्या लक्षात आले. पोलिसांनी या तक्रारीची दखल घेऊन या गर्डर हलणाऱ्या पुलावरची वाहतूक पोलिस ठाण्यातून अधिक कुमक मागून बंद केली आहे. आज या ठिकाणी केटीएम कंपनी आणि सार्वजनिक बांधकाम महामार्ग विभाग यांच्या वतीने या गर्डरच्या दुरुस्ती कामाला सुरुवात करण्यात आली होती. हा पूर्ण खड्डा खोदून पुन्हा त्या ठिकाणी नव्याने सिमेंट ,काॅक्रीट (रॅपीड हार्डींग सिमेंट) मटरेल तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली टाकण्याचे काम सुरू होते. त्यामुळे हा पूल वाहतुकीसाठी कधी खुला होईल, हे सांगणं आता तरी अशक्य आहे.
महामार्गावरील दोन्ही पुलांना मोठमोठे खड्डे
जगबुडी नदीवरील मुंबईहून गोव्याकडे जाणाऱ्या दिशेच्या मार्गीकेवर पुलाला अवजड वाहनांमुळे खड्डे पडलेत. त्यामुळे पुलाच्या पृष्ठभागावरचे सिमेंट काँक्रीट आणि डांबरी रस्ता पूर्ण तुटून गेला होता. त्यामुळे पुलास वापरलेल्या लोखंडी सळ्या दिसून लागल्या आहेत. हा गंभीर प्रकार महामार्ग विभागासह ठेकेदारांच्या जबाबदार अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिला. परंतु सगळे दुर्लक्ष करत होते. महामार्गावरील भरणे पुलावर वाहतुकीचा ताण जास्त आहे. त्यामुळे हा पूल वाहतुकीकरिता धोकादायक अधिक बनवत होता. याबाबत केंद्रीय रस्ते वाहतूक विभागाचे मंत्री नितीन गडकरी व सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांची लवकरच भेट घेऊन याचे निवेदन फोटो सह सादर करणार आहे.– तक्रारदार रुपेश सुरेश पवार