(पाचल / वार्ताहर)
राजापूर तालुक्यातील मूळ करक गावचे नंदकुमार शेट्ये यांची मुलगी तिर्था हिचा शुभविवाह श्री व सौ.अस्मिता अजित पाटील कर्ला-रत्नागिरी, यांचे सुपुत्र स्मित यांच्यासोबत नुकताच पार पडला. या विवाह सोहळ्याप्रित्यर्थ 28 डिसेंबर रोजी स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला होता. या समारंभाला रत्नागिरी जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी उपस्थित राहून नवंदाम्पत्याला शुभाशीर्वाद व शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर विविध क्षेत्रातील मान्यवरांनीही उभयतांना शुभेच्छा दिल्या.
राजापुरातून व्यवसायानिमित्त रत्नागिरीत स्थायिक झाले नंदकुमार शेट्ये अनेक वर्षे कॉस्मेटिकचा व्यवसाय करतात. आज त्यांच्या व्यवसायाने मोठी उभारी घेतली आहे. सर्वसामान्य घरात जन्मलेल्या नंदकुमार शेट्ये यांनी अनेक गोरगरिबांना मदतीचा हात पुढे केला आहे. त्यामुळे जनमानसात त्यांच्याबद्दल आदराचे स्थान आहे. त्यांच्या स्वभावामुळे अगदी लहान, थोर, अधिकाऱ्यांपासून ते राजकीय नेत्यांपर्यंत त्यांची ओळख व उठबस आहे. शेट्ये यांचे पती-पत्नी आणि एक मुलगी असा छोटासा परिवार आहे. नुकताच नंदकुमार शेट्ये यांच्या मुलीचा विवाह झाला.
मुलीच्या विवाहप्रित्यर्थ स्वागत समारंभ रत्नागिरी येथे स्वराज्यवाडी कर्ला येथे मोठ्या थाटात संपन्न झाला. हा स्वागत समारंभ इतका भव्य दिव्य होता की राजकीय नेत्यांपासून रत्नागिरी पो. अधीक्षक धनंजय कुलकर्णी, पोलीस उपविभागीय अधीक्षक निलेश माईणकर, श्री. डेरे क्राईम ब्रँच रत्नागिरी, ट्राफिक इन्स्पेक्टर तोरस्कर, लांजा तालुका पोलीस निरीक्षक श्री नीलकंठ बगळे, राजापूर तालुका पोलीस निरीक्षक राजाराम चव्हाण, यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली होती. अनेकांनी या समारंभात भेट देऊन वधू वराना आशीर्वाद दिले. या मान्यवरांच्या उपस्थितीने शेट्ये कुटुंब भारावून गेले होते.