( रत्नागिरी /प्रतिनिधी )
द् पॉवर ऑफ मीडिया फ़ाऊंडेशन दक्षिण रत्नागिरी जिल्ह्याच्या वतीने पत्रकार पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यंदाचा पत्रकार सन्मान पुरस्कार दैनिक सामनाचे पत्रकार दुर्गेश आखाडे आणि पत्रकार भूषण पुरस्कार कोकण दिनांक डिजीटल प्लॅटफॉर्मच्या कोमल कुळकर्णी- कळंबटे यांना जाहिर झाला आहे. दि. ६ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता मराठा मंदिर अ. के. देसाई हायस्कूलच्या सभागृहात पुरस्कारांचे वितरण होणार आहे.
द् पॉवर ऑफ मीडिया फ़ाऊंडेशन दक्षिण रत्नागिरी जिल्ह्याचे पत्रकार पुरस्कार वितरणाचे हे चौथे वर्ष आहे. यंदाचा पत्रकार सन्मान पुरस्कार दुर्गेश आखाडे यांना जाहिर झाला आहे. दुर्गेश आखाडे गेली २५ वर्ष पत्रकारितेत कार्यरत आहेत.’ अधिक अधिक वजा’ हे बालनाट्याचे पुस्तक आणि ‘श्रीमान’ हा कथासंग्रह प्रकाशित झाला आहे. त्यांचा ‘प्र.ल.’ हा लघुपट सह्याद्री वाहिनीवरून पाच वेळा प्रसारित झाला आहे. त्यांना भागोजी ट्रस्ट मुंबईचा पत्रकारिता विशेष पुरस्कार प्राप्त झाला आहे. पत्रकार भूषण पुरस्कार कोमल कुळकर्णी- कळंबटे यांना जाहिर झाला आहे. गेली १७ वर्ष त्या पत्रकारितेत कार्यरत आहेत. त्या आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या लेखिका आहेत. २०१४-१५ साली महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियानाचा जिल्हास्तरीय प्रथम पुरस्कार मिळाला होतो. नगरपरिषदेचा उत्कृष्ट महिला पत्रकार पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.२०१६-१७ चा राजमाता जिजाऊ स्वावलंबन उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार प्राप्त झाला आहे. या पुरस्कार वितरणाला उपविभागीय पोलीस अधिकारी नीलेश माईणकर, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते, अ. के. देसाई हायस्कूलच्या मुख्याध्यापिका प्रज्ञा दळी उपस्थित रहाणार आहे.
नीलेश माईणकरांचे स्पर्धा परीक्षेवर व्याख्यान
स्पर्धा परीक्षा म्हणजे काय? या विषयावर उपविभागीय पोलीस अधिकारी नीलेश माईणकर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. विद्यार्थी दशेत मुलांना स्पर्धा परीक्षांची माहिती व्हावी या उद्देशाने द् पॉवर ऑफ मीडिया फ़ाऊंडेशन दक्षिण रत्नागिरी हा व्याख्यानाचा उपक्रम राबवत आहे.