(रत्नागिरी)
गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात आज दि. १८ डिसेंबर रोजी झेप महोत्सवाचा पहिला दिवस प्रेरणादायी ठरला. महोत्सवाची सुरुवात उद्योजकीय स्टॉल्सच्या उद्घाटनाने झाली, ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी खाद्य उद्योग, सेवा उद्योग, उत्पादन उद्योग आणि डिजिटल उद्योग अशा विविध क्षेत्रांतील नवनवीन कल्पना सादर केल्या. कला प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले, ज्यामध्ये पोस्टर, रांगोळी, मेहेंदी, कोलाज आणि चित्रकला यांसारख्या सर्जनशील कलाकृतींचे प्रदर्शन झाले. विद्यार्थ्यांनी आपल्या कलाकृतींमधून सामाजिक संदेश दिले आणि पर्यावरण संरक्षणासारख्या विषयांवर प्रकाश टाकला.
संगीत कार्यक्रम हा महोत्सवाचा आणखी एक आकर्षण ठरला. सोलो, ड्युएट, आणि ग्रुप गायन स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी पारंपरिक आणि आधुनिक गाणी सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली. ऍड.संकेत घाग, काश्मिरा सावंत (गायिका), ओंकार बंडबे (गायक व गोगटे युथ साँग डायरेक्टर) या परीक्षकांनी स्पर्धकांच्या गायन कौशल्याचे कौतुक केले आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी मार्गदर्शन केले.
फॅशन इव्हेंट हा महोत्सवाचा सर्वाधिक चर्चेत असलेला भाग होता. यात फॅशन शो, मेकअप, हेअरस्टाईल, आणि वर्सटाईल पर्सनॅलिटी कॉन्टेस्ट यांचा समावेश होता. विद्यार्थ्यांनी पारंपरिक, फ्यूजन आणि मॉडर्न थीमवर आधारित पोशाख सादर करून उपस्थितांना प्रभावित केले. या इव्हेंटचे परीक्षण समर आयरे (अभिनेता), शलाका संधू (फॅशन डिझायनर) आणि ऐश्वरी सुर्वे (फॅशन मॉडेल) यांनी केले. त्यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षेत्रातील यशासाठी उपयुक्त टिप्स दिल्या. झेप महोत्सवाचा पहिला दिवस विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी, सर्जनशीलता वृद्धी करणारा आणि उत्साहपूर्ण ठरला.
झेप महोत्सव समन्वयक डॉ आनंद आंबेकर , विद्यार्थी सचिव मिहिका केनवडेकर आणि कोअर कमिटी आणि विद्यार्थी मंडळ खुप मेहनत घेतली आहे.
रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे पदाधिकारी कार्याध्यक्षा श्रीमती शिल्पाताई पटवर्धन, कार्यवाह श्री.सतीश शेवडे सह कार्यवाह प्रा.श्रीकांत दुदगिकर, श्री.विवेक भावे, डॉ.चंद्रशेखर केळकर, डॉ.संजय केतकर, सी.ए.मंदार गाडगीळ, प्रा.महेश नाईक, प्रा. डी.आर. वालावलकर, प्राचार्य डॉ.मकरंद साखळकर, प्रशासकीय उपप्राचार्य डॉ.सुरेंद्र ठाकूरदेसाई, उपप्राचार्य डॉ.अपर्णा कुलकर्णी, उपप्राचार्य डॉ.चित्रा गोस्वामी, उपप्राचार्य डॉ.सीमा कदम उपस्थित होते.