(चिपळूण)
तालुक्यातील डेरवण येथील मठाच्या बाजूस असलेल्या जंगलात जळावू लाकूड तोडणीसाठी गेलेल्या वृद्धाचा झाडावरून पडल्याने मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सकाळी ९:५० वाजण्याच्या सुमारास घडली. शिवाजी धोंडू महाडीक (६९, डेरवण गवळवाडी, चिपळूण) असे त्यांचे नाव आहे.
शिवाजी महाडीक डेरवण मठाच्या मागील बाजूस असलेल्या जंगलात झाडतोडणी करत होते. अचानक त्यांचा फांदीवरून पाय घसरला आणि ते जमिनीवर कोसळले. त्यांच्या डोक्याला व बरगडीला जबर मार बसून गंभीर दुखापत झाली. त्यांना उपचारासाठी डेरवण रुग्णालयात नेण्यात आले होते. मात्र त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला.