(चिपळूण)
कळकवणे राजवाडा येथील दोन मुलींच्या मृत्यूचे गूढ आता अधिक वाढले आहे. ज्या स्थितीत हे दोन्ही मृतदेह आढळून आले ते पाहता घातपाताचा संशय अधिक बळावला असून त्या अनुषंगाने पोलिसांनीदेखील तपासाला वेग दिला आहे. नदी किनारी आढळून आलेले मृतदेह तसेच मृतदेहावर आढळून आलेल्या खुणा यामुळे पोलिसही सखोल तपास करत आहेत.
सोनाली आणि मधुरा या इयत्ता ९ वी मध्ये शिकणाऱ्या कळकवणे राजवाडा येथील मुली शनिवारी दुपारी येथील वैतरणा नदीकिनारी कपडे धुण्यासाठी त्यांचा मृत्यू झाला होता. रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याची प्राणज्योत मावळली. या घटनेची माहिती मिळताच शिरगाव अलोरे पोलीस ठाण्याचे पोलिस तत्काळ घटनास्थळी पोहचले होते. कामथे रुग्णालयात शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले व शोकाकूल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र त्या दोन्ही मुलींचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, या बाबत परिसरात उलटसुलट चर्चा ऐकण्यास मिळत आहेत. परंतु ठोस असे कोणतेच कारण पुढे येत नसल्याने संशया आधारे तपास सुरु आहे. पोलिसांनी तातडीने चौकशी सुरू केली असून परिस्थितीजन्य काही गोष्टीवरही लक्ष केंद्रित केले जात आहे.
प्रत्यक्षात मृतदेह नदीत नव्हे तर नदी किनारी आढळून आल्याने ही आत्महत्या नसावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. तसेच मारहाण झाल्याच्या कोणत्याही खुणा शरीरावर नाहीत. तसेच अत्याचार देखील झालेला नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. परंतु मृतदेहाच्या शरीरावर काही जखमा आढळून आल्या असल्याने घातपाताच संशयही बळावला आहे. परंतु त्या खडकावर पडलेल्या आढळून आल्याने त्या जखमा खडकाच्या तर नाहीत ना? या संदर्भात देखील पोलीस चौकशी करत आहेत. उष्माघाताचा अटॅक आला असावा का? मग दोघींना एकाचवेळी कसा..? असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत असून पोलिस यंत्रणा प्रत्येक बाजूने सखोल तपास करत आहेत. दरम्यान, मृत मुलींचा ‘व्हिसेरा’ तपासणीसाठी प्रयोशाळेत पाठविण्यात आले आहेत. या अहवालाची प्रतीक्षा करावी लागणार आहे यातून काही बाबी स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
Follow us on Google News : https://news.google.com/s/CBIw9dzq7KQB?sceid=IN:en&sceid=IN:en&sceid=IN:en&r=0&oc=1