(रत्नागिरी)
सन २०२३-२०२४ या वर्षातील शासकीय इंटरमीजिएट व एलीमेंटरी सर्टिफिकेट परीक्षेचा दि मॉडेल इंग्लिश स्कुल सैतवडेचा निकाल १०० टक्के लागला आहे. या एलीमेंटरी परीक्षेस संजीवनी रमेश भुवड, निरजा राजकुमार धातकर, संस्कृती सुनील कांबळे, पुजन रमेश धातकर, श्वेतम रुपेश लोकरे, अन्वया निलेश पावरी, तन्मय संजय सावंत व मिहीर संतोष झर्वे यांनी यश प्राप्त केले. तसेच रेखाकला परीक्षा इंटरमीजिएट परीक्षेत अरमान शरद पोवार,आयुष सुनील झर्वे, अश्लेषा रुपेश लोकरे, अश्विनी यशवंत वरवटकर, आर्यन अरविंद मोरे, राज रामचंद्र भुवड, सागर शिवाजी केसरकर, प्रिया मंदार अजगोलकर, तन्वी नारायण बळकटे, रिया कैलास पावसकर, विध्नेश सुर्यकांत चौघुले, आयुष शरद पावसकर, सार्थक राजेंद्र जाधव, तृप्ती राजेश सावंत व सुजल प्रकाश भुवड या विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले.
या सर्व विद्यार्थ्यांना कला शिक्षक श्री विनोद चंद्रकांत पेढे यांनी विशेष मार्गदर्शन केले. या सर्व विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे मुख्याध्यापक विलासराव कोळेकर व मुस्लिम एज्युकेशन सोसायटीच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.