(रत्नागिरी)
महिलेच्या साडीने पेट घेतला यामध्ये महिला प्रचंड भाजली. त्या महिलेला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला. पार्वती ओमप्रकाश भाटकर (रा. महाजनवाडी, भाट्ये, रत्नागिरी) असे मृत महिलेचे नाव आहे. ही घटना शनिवारी (ता. ७) सकाळी सहाच्या सुमारास जिल्हा शासकीय रुग्णालयात घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार खबर देणार यांची मयत आई या पानाच्या टपरीत असताना मच्छर घालविण्यासाठी नारळाच्या सोडणांची धुरी केली होती. अचानक त्यातील निखारा त्यांच्या साडीवर पडला. पदराने पेट घेतला. यात भाजलेल्या महिलेला अधिक उपचारासाठी सीपीआर कोल्हापूर येथे हलविण्यात आले होते. तिच्या तब्बेतीत सुधारणा होत नसल्याने शनिवारी तिला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. उपचारासापबर्वीच तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले.