( ठाणे )
मुंबईत वास्तव्याला असणारी 19 वर्षाची तरुणी बदलापूरमध्ये रहात असलेल्या आपल्या मैत्रिणीकडे आली होती. खास पार्टी करू, असं या दोघींचं ठरलं होतं. दरम्यान, बियरने दोघींची पार्टी सुरू झाल्यावर बदलापूरच्या मैत्रिणीने तिच्या रिक्षाचालक मित्रालाही या पार्टीमध्ये बोलवलं. दत्ता जाधव असं त्याचं नाव होतं. या तिघांनी मिळून पार्टी केली. पार्टीमध्ये तिघेही बिअर प्यायले.
मुंबईहून आलेल्या मैत्रिणीला बिअर जास्त झाली. ती आपली शुद्ध हरपून बसली होती. तीला काहीही समजत नव्हते. अशा वेळी रिक्षा चालक आणि दुसरी मैत्रिण यांची पार्टी सुरूच होती. 19 वर्षाची तरुणी आपली शुद्ध पुर्ण हरपली आहे, हे त्या रिक्षा चालकाच्या लक्षात आले. त्यानंतर त्याच्यातला हैवान जागा झाला. त्याने तिचा गैरफायदा घेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. विशेष म्हणजे या कृत्यात तिच्याच मैत्रिणीने त्या रिक्षा चालकाला साथ दिली. ज्यावेळी त्या तरुणीला शुद्ध आली, त्यावेळी तिला आपल्या बरोबर काही तरी चुकीचे झाले आहे हे लक्षात आले. ही घटना 21 डिसेंबरला घडली. त्यानंतर तिने झालेल्या प्रकाराविरोधात तक्रार करण्याचे ठरवले.
23 डिसेंबरला ती थेट बदलापूर पूर्व पोलिस स्थानकात गेली. झालेला सर्व प्रकार तिने पोलिसांना सांगितला. त्यानंतर तक्रारीचे गांभिर्य लक्षात घेवून पोलिसांनी तातडीने गुन्हा नोंद केला. शिवाय आरोपीला शोधण्यासाठी हालचाली सुरू केल्या. 12 तासानंतर पोलिसांनी त्या नराधम रिक्षा चालक असलेल्या दत्ता जाधव या बेड्या ठोकल्या. तो बदलापूरच्या खरवई परिसरात लपून बसला होता. आपल्याला पोलिस शोधत आहेत याची माहिती त्याला लागली होती.
पोलीस ज्यावेळेस त्याला अटक करण्यासाठी गेले, त्यावेळेस पोलिसांच्या भीतीने तो बहिणीच्या घरातील लोखंडी कपाटात लपून बसला होता. मात्र पोलिसांनी अतिशय शिताफिने त्याला शोधून काढत बेड्या ठोकल्या. अवघ्या १२ तासात नराधम रिक्षाचालक दत्ता जाधव याला खरवई परिसरातून बेड्या ठोकल्या. तर त्याच्या या कृत्यात साथ देणाऱ्या त्याच्या मैत्रिणीलाही पोलिसांनी अटक केली आहे. याबाबतचा अधिक तपास पोलिस करत आहेत.