(रत्नागिरी)
राजापूर तालुक्यातील पाचल येथे वडील मोबाईल गेमवरून ओरडल्याच्या रागातून गळफास घेण्याचा प्रयत्न केला. ही घटना मंगळवार, ९ जुलै रोजी सकाळी १० वा. सुमारास घडली. तेजस सत्यवान गुरव (१८, रा. पाचल, राजापूर) असे गळफास घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाचे नाव आहे.
तेजसला मोबाईलवर पब्जी गेम खेळण्याची सवई लागली होती. त्यावरून त्याचे वडील त्याला ओरडले होते. याचा राग आल्याने मंगळवारी सकाळी त्याचे आई-वडील शेतात गेल्यावर त्याने राहत्या घरी गळफास घेण्याचा प्रयत्न केला. ही बाब घरातील इतर नातेवाईकांच्या लक्षात येताच त्यांनी त्याला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेजसची प्रकृती स्थिर असून याबाबत जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या पोलिस चौकीत नोंद करण्यात आली आहे.